Voter ID Card: मुंबई महापालिका निवडणुकीत मतदारांना मतदान केंद्रावर ओळखपत्र दाखवावे लागेल. मतदार ओळखपत्र नसल्यास राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा चालेल. आयुक्त भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली.
१५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करावे. परंतु, ज्यांच्याकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसेल, अशा मतदारांना ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागेल, अशी माहिती गगराणी यांनी दिली. लोकशाही प्रक्रियेत मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांनी तो बजावावा, असे गगराणी म्हणाले.
Public Holiday: 15 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी; मात्र मतदानासाठी ‘या’ कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा नाही; सुट्टीऐवजी…
मतदार ओळखपत्र नसल्यास हे पुरावे ग्राह्य
- पासपोर्ट
- आधार ओळखपत्र
- वाहन चालविण्याचा परवाना
- पॅन कार्ड
- केंद्र शासन, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्रासह दिलेली ओळखपत्रे.
- राष्ट्रीयीकृत बँका किंवा टपाल खात्यामधील खातेदाराचे छायाचित्र असलेले पासबुक
- सक्षम प्राधिकाऱ्याने छायाचित्रासह दिलेला दिव्यांग (अपंगत्वाचा) दाखला
- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड)
- निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे (उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.)
- लोकसभा, राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा, विधान परिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
- स्वातंत्र्यसैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र
- केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड
BMC Election: आजपासून मुंबईत मोठी वाहतूक बंदी; सायन, मालाड… अनेक मार्गांवरील वाहने वळवली, घराबाहेर पडण्यापूर्वी पर्यायी मार्ग पाहा
घरोघरी प्रचाराची उमेदवारांना मुभा
मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी ५.३० वाजता थंडावल्या. मात्र, जाहीर प्रचार संपला असला तरी उमेदवाराला घरोघरी प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. उमेदवार पाचपेक्षा कमी लोकांना सोबत घेऊन वैयक्तिक पातळीवर प्रचार करू शकतात, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी दिल
