Mumbai Airport Flights : मुंबई विमानतळावरुन मोठ्या प्रमाणात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं झाली असून यावर्षीचा हा आकडा, यंदाची प्रवासी वाहतूक विक्रमी होती.
विमानांच्या ये-जामध्ये 25 टक्क्यांनी वाढ
मुंबई विमानतळावर एकूण 3 लाख 31 हजार 11 विमानांची ये-जा (एटीएम) झाली, ज्यामध्ये 92,141 आंतरराष्ट्रीय एटीएम आणि 2 लाख 38 हजार 870 देशांतर्गत एटीएमचा समावेश होता. या विमानतळावर या वर्षात 2022 च्या तुलनेत जवळपास 25 टक्क्यांनी विमानांची ये-जा वाढली आहे. यासोबतच मुंबईपासून नवीन शहरांपर्यंत विमानसेवाही यंदा सुरू झाली आहे.
Mumbai News : मुंबईतील आणखी एका पुलाची दुरावस्था; तुटलेल्या पायऱ्या, कचऱ्याचा ढिग… धोकादायक स्थितीत शाळकरी मुलं, वृद्धांची ये-जा
अल्माटी, अम्मान, बाली (डेनपसार), कोपनहेगन, फुजैराह, क्राबी, मँचेस्टर आणि तिबिलिसी. आदमपूर, अमरावती, हिंडन, झारसुगुडा, पोरबंदर आणि सोलापूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू झाल्यामुळे देशांतर्गत जाळे आणखी मजबूत झाले आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील श्रद्धा धवनला अखेरचा निरोप, मुलुंडवासीयांकडून श्रद्धांजली!
मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणंही अव्वलस्थानी
सन 2025 मध्ये मुंबईहून सर्वाधिक विमाने दिल्लीला उडाली. त्यानंतर बेंगळुरू आणि गोव्याचा समावेश होता. दिल्लीला 17 टक्के प्रवासी वाहतूक झाली. आंतरराष्ट्रीय ठिकाणांमध्ये दुबईला 15 टक्के प्रवासी वाहतूक झाली. विमान प्रवाशांनी प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये जाण्याला प्राधान्य दिल्याचे समोर आले. त्यानंतर 28.2 टक्क्यांसह आशिया-पॅसिफिक आणि 14.5 टक्क्यांसह युरोप यांचा क्रमांक होता इंडिगो, एअर इंडिया आणि एमिरेट्स या सेवा आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीमध्ये अव्वलस्थानी होत्या, तर इंडिगो, एअर इंडिया आणि आकासा एअर या देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत अव्वल ठरल्या.
