Dr Manisha Jejurkar Death Case : डॉ. नीलेश चार दिवस, तर डॉ स्वाती एक दिवस पोलिस कोठडीत होती. नीलेशने चौकशीदरम्यान पोलिसांच्या प्रश्नांची जेमतेम उत्तरे दिली, तर स्वातीने मात्र सहकार्य केले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी
दोघांचेही मोबाइल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले असून, त्याच्या अहवालानंतर दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी होणार आहे. त्यानुसार न्यायालयाने दोघांच्याही उर्वरित पोलिस कोठडीचा हक्क राखीव ठेवत सध्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
डॉ. नीलेश चार दिवस, तर स्वाती न्यायालयाच्या आदेशान्वये एक दिवस पोलिस कोठडीत होती. नीलेशने चौकशीदरम्यान पोलिसांच्या प्रश्नांची जेमतेम उत्तरे दिली असून स्वातीने मात्र सहकार्य केले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
BMW Car Crash : धैर्यचं लाईव्ह लोकेशन फ्रीझ का झालंय? आईने थरथरत्या हातांनी लेकाला फोन फिरवला, पोलिसांचं उत्तर ऐकताच अवसान गळालंदोघांविरुद्ध गंगापूर पोलिसांत दाखल फिर्याद, साक्षीदारांचे जबाब याबाबतचे पुरावे न्यायालयात सादर झाले असून, दोघांच्याही मोबाइलमधील ‘चॅटिंग’चे पुरावे फॉरेन्सिक विभागामार्फत पोलिसांना लवकरच प्राप्त होणार आहेत. त्यानंतर दोघांची पुन्हा पोलिस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे.
मृत्यू प्रकरणाला सहा महिने
गंगापूर रोडवरील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमध्ये ६ मार्च २०२६ रोजी डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आयुष्याची अखेर केली होती. त्यांची बहीण रोहिणी थोरात यांच्या फिर्यादीवरून पती डॉ. नीलेशविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या फिर्यादीमध्ये डॉ. स्वाती चव्हाण हिच्याही नावाचा उल्लेख असून, तिला सहसंशयित केल्याचे सरकारवाडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त आणि प्रकरणाचे तपास अधिकारी प्रमोद वाघ यांनी सांगितले होते.
BMW Car Crash : बीएमडब्ल्यू कार अपघातापूर्वी चौघं मित्र पार्टी करत होते? पोलिसांचा तपास, जखमी तरुणाचे ब्लड सॅम्पल न मिळाल्याने अडथळादरम्यान, घटनेनंतर १९३ दिवस न्यायालयीन बाबींनुसार नीलेशने बचावाचा प्रयत्न केला. मात्र आधी नाशिक सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि शेवटी १७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. उच्च न्यायालयाने हे प्रकरण केवळ आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे नसून, हत्येचे असल्याचा संशयही व्यक्त केला होता.
बहिणीची फिर्याद
रोहिणी थोरात यांच्या फिर्यादीनुसार, ‘डॉ. स्वाती चव्हाण जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार विभाग प्रमुख होती. तिने डॉ. नीलेशने तिच्यासोबत जवळीक साधून घरातील सर्व गोष्टी तिला सांगितल्या. शिवाय तिच्या मनाप्रमाणे वागत डॉ. मनीषाकडे दुर्लक्ष केले आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले.’
Sahil Wakode : परीक्षा केंद्रात साहिल खिशातून काहीतरी काढताना दिसतो, डुल्लांची विचारणा, पोलिसांना सीसीटीव्हीत काय दिसलं? महत्त्वाचे पुरावे हाती
नीलेश दाजींचं वागणं बिघडलंय
दिवाळीत मनीषा आई-वडिलांकडे आली असताना तिने ‘पती नीलेश विनाकारण त्रास देत आहे’, असे सांगितले होते. मनीषा यांनी रोहिणी थोरात यांना १४ डिसेंबर २०२५ रोजी ‘तुझे दाजी नीलेश यांचे वागणे खूप बिघडले असून ते नेहमी डॉ. स्वातीच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतात’, असे सांगितल्याचे रोहिणींनी फिर्यादीत म्हटले आहे.
मुलींचा सांभाळ कर
याच संवादादरम्यान मनीषा यांनी ‘मी खूप निराश झाले असून पुढे जगण्याची इच्छा संपली आहे. माझं काही कमी-जास्त झालं, तर माझ्या मुलींचा सांभाळ कर’, अशा शब्दात भावना व्यक्त केल्याचं बहीण रोहिणी थोरात यांनी फिर्यादीत नमूद केलं आहे.
