• Wed. Sep 23rd, 2026

Weather Alert : महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाचा जोर वाढला, सर्वत्र पावसाचं धुमशान, 72 तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा ताजा अंदाज

Maharashtra Weather Alert : सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 3 दिवस राज्यात पावसाचं धुमशान सुरू राहील.

आजचा हवामान अंदाज(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर जाणवत आहे. गेल्या काही काळापासून गायब झालेला पाऊस आता जोरदार बरसत आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्यातील काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. तरीही अद्याप संपूर्ण राज्यात सर्वदूर पाऊस झालेला नाही. अशातच पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम काय राहील का? याबाबत हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोकणात पावसाचा यलो अलर्ट

23 सप्टेंबर रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही सांगितला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथे हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि घाटमाथा परिसरातही पावसाच्या सरींसह 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesNashik Crime : डॉ नीलेश जेजूरकरचं डॉक्टर मैत्रिण स्वाती चव्हाणशी काय चॅटिंग व्हायचं? मोबाईल फॉरेन्सिककडे, दोघं एकत्रच मध्यवर्ती कारागृहात

शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा

पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथा परिसरात जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता असून, या भागात पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतीसह नागरिकांनाही काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसासह काही ठिकाणी जोरदार सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

विदर्भातही कोसळण्याची शक्यता

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. एकंदरीत, राजस्थानमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. अशातच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज, 23 सप्टेंबर रोजी राज्यातील 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. तर गुरुवारपासून पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांना सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट असेल. या काळात सोसाट्याचा वारा, विजांसह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा