• Wed. Sep 23rd, 2026

Nagpur Crime: 11 वर्षांचे प्रेमसंबंध, प्रियकराचा लग्नास नकार, व्हिडिओ कॉलवर तरुणीने संपवलं जीवन, 23 मिनिटं लाईव्ह सुरुच

Nagpur Crime: अंजली लग्नाबाबत विचारायची तेव्हा सचिन गप्प बसायचा. काही दिवसांपूर्वी सचिनने तिला लग्नास नकार दिला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : शारीरिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने प्रियकराला व्हीडिओ कॉल करीत प्रेयसीने आत्महत्या केली. प्रेयसीने आत्महत्या केल्यानंतर तब्बल २३ मिनिटे हा कॉल सुरू होता. ही धक्कादायक घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सचिन डहाट (वय ३४) रा. शिवाजीनगर, अमरावती असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. अंजली (बदलेले नाव) असे मृताचे नाव आहे. तो सध्या पुण्यात राहात असून सावित्रीबाई फुले विद्यापीठात पीएचडी करीत आहे.

Maharashtra TimesBageshwar Baba: बागेश्वर बाबा पुन्हा अडचणीत, ‘पुत्रयोगा’चा दावा खोटा ठरला? भक्ताला चौथ्यांदाही मुलगी, कुटुंबाची अंनिसकडे तक्रारडिसेंबर २०२५पासून अंजली नागपुरातील एका कंपनीत काम करायची. ती धंतोलीत मैत्रिणीसोबत राहायची. प्राप्त माहितीनुसार, सचिन व अंजलीचे २०१५पासून प्रेमसंबंधआहेत. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. लग्नाचे आमिष दाखवून सचिनने अंजलीचे शारीरिक शोषण केले. काही दिवसांपूर्वी तो मित्रासह अंजलीच्या आईला भेटायला गेला. अंजलीशी लग्न करणार असल्याचे त्याने तिच्या आईला सांगितले. तिच्या आईने होकार दिला. सचिनने आई व भावाला माहिती दिली. त्यांनी मात्र लग्नास नकार दिला. सचिनने याबाबत गुप्तता बळगली. तो नागपुरात येऊन अंजलीला भेटायला लागला. तिचे शोषण करायला लागला.

लग्नाचा तगादा लावल्यास आक्षेपार्ह छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी त्याने अंजलीला दिली. याचा अंजलीच्या मनावर परिणाम झाला. १९ सप्टेंबरला रात्री अंजलीने पंख्याला ओढणी बांधली. त्यानंतर तिने सचिनला व्हीडिओ कॉल केला. तिने आत्महत्या करीत असल्याचे त्याला सांगितले. सचिन याने तिला मनाई केली नाही. अंजलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्या केल्यानंतरही व्हीडिओ कॉल २३ मिनिटे सुरूच होता, असे अंजलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Maharashtra TimesPandharpur News : 10 वर्षांचं प्रेम, तरीही वृद्ध महिलेने प्रियकराला का संपवलं? पंढरपूरच्या प्रकरणात मोठा खुलासामोबाइल ब्लॉक केला, प्रियकराने जीव दिला
नागपूर : प्रेयसीने मोबाइल क्रमांक ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने गळफास घेऊन जीवन संपविले. ही हृयद्रावक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. प्रेम (वय २३) असे मृताचे नाव आहे. तो रेल्वेतील पेन्ट्रीकारमध्ये काम करायचा.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा