Maharashtra Live News: राज्यातील थंडीची लाट ओसरली असून कडाक्याची थंडी आता कमी जाणवू लागली आहे. दरम्यान, राज्यातील महापालिका निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. BMC निवडणुकांसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर काल वंचितला 62 जागा देण्यात आल्या. मात्र, या जागावाटपावरून काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर मुंबईत उबाठा-मनसे आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा सोडल्या आहेत.
राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स पाहा फक्त एका क्लिकवर
