Mumbai Railway Station: मुलुंड रेल्वे स्थानकाचा चेहरा बदलतोय. जोडी पूल, 14 जिने, 7 एस्कलेटर आणि भव्य प्रवेशद्वाराच्या कामाला गती मिळाली आहे. पण हा प्रकल्प पूर्ण कधी होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती.
काय-काय बदलणार?
या आधुनिकीकरण प्रकल्पाअंतर्गत स्थानकावर 14 जिने, सात एस्कलेटर आणि दोन लिफ्ट्ससह उन्नत डेक उभारण्यात येत आहे. याशिवाय नवे भव्य प्रवेश प्लाझा आणि सर्व पादचारी पुलांचे (FOB) अखंड एकत्रीकरण केले जात आहे. सीएसएमटीच्या दिशेला जोडी कनेक्टर पूल आगामी पूर्व–पश्चिम बीएमसी पुलाला एका नव्या, अधिक रुंद रेल्वे पादचारी पुलाशी जोडणार आहे. त्यामुळे स्थानकातील प्रवाशांची ये-जा लक्षणीयरीत्या सुलभ होणार आहे.
Bandra Skywalk: वांद्र्यात बनतोय सर्वात महागडा स्कायवॉक, 123 कोटींचा प्रकल्प अंतिम टप्प्यात; कुठून-कुठे जोडणार?
सीएसएमटीकडील नवीन रेल्वे पादचारी पूल आठ मीटर रुंद आणि 45 मीटर लांब असून तो थेट प्लॅटफॉर्मशी जोडलेला असेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर तीन मीटर रुंद जिना आणि प्लॅटफॉर्मच्या काठापर्यंत विस्तारलेला 10.5 मीटर रुंद डेक उभारण्यात येणार आहे. येथे एक एस्कलेटरही उपलब्ध असेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर खांब उभारण्यात आले असून, प्लॅटफॉर्म 4 पूर्वेकडील सार्वजनिक पादचारी पुलाशी जोडला जात आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी होणारी कोंडी कमी होणार असून, सध्या प्रवाशांना रुळांवर किंवा जिन्यांवर उतरावे लागणारी गैरसोय टळणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दोन नवीन पुलांची बांधणी
कल्याणच्या दिशेने सहा मीटर रुंद आणि 43 मीटर लांबीचा उत्तर दिशेचा पादचारी पूल (FOB) उभारण्यात येत असून, तो प्रवाशांच्या गर्दीचे वितरण करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या संपूर्ण प्रकल्पातील सर्वात मोठा भाग म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या बाजूने उभारण्यात येणारा 165 मीटर लांब आणि 16.5 मीटर रुंद उन्नत डेक. या डेकचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.
Mumbai Local: मुंबईकरांच्या न्यू इयर पार्टीला ब्रेक नाही! पश्चिम आणि मध्य रेल्वेवर उशिरापर्यंत लोकल सेवा; कसं असेल वेळापत्रक?
तसेच नवीन आठ मीटर रुंद आणि 53 मीटर लांबीचा पादचारी पूल सध्याच्या 4.5 मीटर रुंद संरचनेची जागा घेणार आहे. नवीन सीएसएमटीकडील पादचारी पूल सुरू झाल्यानंतरच जुना पूल पाडण्यात येणार आहे.
फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राच राजकारण नशेखोर राजकारण होतंय, संजय राऊतांची टीका
कधी होणार कामे पूर्ण?
सीएसएमटीच्या दिशेकडील आठ मीटर रुंद पादचारी पूल मार्च 2026 पर्यंत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. तर कल्याणकडील सहा मीटर रुंदीचा पादचारी पूल जुलै 2026 मध्ये सुरू होणार आहे. संपूर्ण प्रकल्पाचे काम जून 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
