Beed Accident : बीडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 कामगार जखमी झाले असून एका बैलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
14 जण गंभीर जखमी
या अपघातात एकूण 14 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी पूजा नाना शेंडगे (वय 30) आणि शरद शेंडगे (वय 40) यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना तातडीने
अहिल्यानगर येथील इंपल्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. उर्वरित 12 जखमींवर तिसगाव येथील श्री. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामध्ये अभिषेक मरगळ, विशाल मरगळ कोमल ठेंगल, राणी ठेंगल, अशोक ठेंगल सीमा शेंडगे, संगीता शेंडगे, बबन शेंडगे, लिलाबाई शेंडगे, आदित्य शेंडगे, तुळजाई शेंडगे आणि राणी गोल्हार बहुतेक जखमींना गंभीर स्वरूपाचे फ्रॅक्चर आणि अंतर्गत जखमा झाल्या आहेत.
Crime News: घरात आई रक्ताच्या थारोळ्यात अन् शेजारी 3 वर्षीय मुलाची बॉडी; नराधम शेजाऱ्याला आता कायमची अद्दल, कोर्टाने…
आमदार सुरेश धस यांची तत्परता
घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून रुग्णवाहिका आणि मदतीची व्यवस्था केली. आ. धस यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली आणि जखमींच्या कुटुंबियांना धीर दिला. घटनेनंतर पोलीस अधिकारी केदार स, पालवे आणि पाथर्डी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पुजारी साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आमदार सुरेश धस यांनी दोषी वाहनचालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या अपघातामुळे ऊसतोडणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
