Mumbai Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. डिसेंबर अखेर पर्यंत मेट्रो 9 आणि मेट्रो 2 बी चे काही भाग सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईतील प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मेट्रो 9 दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर पर्यंत जोडणार आहे.
एमएमआरडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पूर्व–काशीगाव दरम्यानच्या मेट्रो लाईन 9 चा काही भाग आणि डायमंड गार्डन–मंडाळे दरम्यानच्या मेट्रो लाईन 2 बी चा काही भाग 31 डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होऊ शकतो. दोन्ही मेट्रो मार्गांच्या उद्घाटनाचा हा पहिला टप्पा असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे, मेट्रो रेल सेफ्टी कमिशनर (CMRS) लाईन 9 ला मंजुरी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या दोन्ही लाईन्सचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेवर धावणार 12 विशेष लोकल; तर ‘या’ एक्स्प्रेस रद्द, पाहा वेळापत्रक
मेट्रो 7 चा विस्तार
मेट्रो लाईन 7 चा विस्तार करून त्याला पुढे मेट्रो लाईन 9 जोडण्यात आली आहे. ही संपूर्ण एलिव्हेटेड मेट्रो मार्गिका दहिसर पूर्व येथून मिरा-भाईंदरपर्यंत जोडणी साधणार आहे. सध्या मेट्रो 7 गुंदवली–दहिसर पूर्वेपर्यंत कार्यरत आहे. त्यापुढे मेट्रो 9 सुरू झाल्यामुळे पश्चिम मुंबईपासून ठाण्यापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून, प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. हा मार्ग 13.58 किमी लांबीचा आहे.
दरम्यान, मानखुर्द परिसरातील डीएन नगर ते मांडले दरम्यान जाणाऱ्या मेट्रो लाईन 2 बी चे बांधकाम सध्या सुरू आहे. या मार्गाचा पहिला टप्पा म्हणून चेंबूरमधील मांडळे–डायमंड गार्डन दरम्यानचा 5.3 किमी लांबीचा भाग चाचणीसाठी तयार झाला असून त्यावर चाचण्या सुरू आहेत.
निवडणुकीत पैसेवाटप, निवडणूक आयोग ते विरोधी पक्षनेते पद; भास्कर जाधव प्रचंड संतप्त
पुढील वर्षांत मेट्रो 2 बी
मेट्रो लाईन 2 बीचा दुसरा टप्पा डीएन नगर ते खार (सारस्वत नगर) दरम्यान जोडेल आणि हा टप्पा पुढील वर्षी उन्हाळ्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर केवळ तिसरा टप्पा उरेल, ज्यामध्ये सारस्वत नगर ते डायमंड नगर जोडले जाणार आहे. पूर्ण झाल्यावर मेट्रो 2 बी हा 23.6 किमी लांबीचा, एकूण 20 स्थानकांचा विस्तृत मार्ग असेल. या मार्गिकेमुळे पूर्व–पश्चिम कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळेल.
