Solapur Car Accident : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावात रविवारी रात्री कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला
कार आणि ट्रकची समोरासमोर धडक
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावात रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. पांगरी गावाजवळील जांभळबेट पुलावर मालट्रक आणि कारचा समोरासमोर धडक झाली आहे. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
पाच जणांचा जागीच मृत्यू
पांगरी गावाजवळ झालेल्या अपघातात गौतम कांबळे, जया कांबळे, संजय वाघमारे, सारिका वाघमारे यांच्यासह आणखी एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण बार्शी तालुक्यात पसरली. माजी आमदार राजेंद्र राऊत व त्यांच्या समर्थकांनी ताबडतोब बार्शी येथील जगदाळे मामा खाजगी रुग्णालयात जाऊन जखमी व नातेवाईकांची विचारपूस केली.
Pune Crime : सागर यारsss दरवाजा उघड ना, मित्रांच्या हाकाआरोळ्या, पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याने जीव दिला, कारण…
नवदाम्पत्य जखमी; चार दिवसांपूर्वी लग्न
अनिकेत गौतम कांबळे आणि मेघना अनिकेत कांबळे या दोघांचे चार दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. नवविवाहित तरुण-तरुणी दोघे ही गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, जखमी नवविवाहित दम्पत्यला बार्शीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणायत आले आहे.
HSRP नंबरप्लेटला पाचव्यांदा मुदतवाढ, 65 टक्के वाहनं बाकी, काय आहे नवीन तारीख?
मेघना आणि अनिकेतच्या विवाहानंतर देवदर्शन
मेघना आणि अनिकेत यांचा 26 नोव्हेंबर रोजी विवाह झाला होता. या नवदाम्पत्याला घेऊन कुटुंबीय देवदर्शनसाठी तुळजापूरला निघाले होते. मात्र अचानक कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नवदाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे.
