Eknath Shinde Speech: बुलढाणा नगरपालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उमेदवार पूजा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार संजय गायकवाडांची शिंदेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
शिंदे म्हणाले, कुणीही मायचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हा माझा शब्द आहे. काही लोक अफवा पसरवतात. त्याकडे लक्ष देऊ नका. आरोप-प्रत्योराप करणे, टोमणे मारणे हे आमचे काम नाही. आम्हाला हवीय डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट! त्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देईल. बुलढाण्यात प्रचाराला येण्यापेक्षा मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला आलो आहे. मुख्यमंत्री असल्यापासून येथे आतापर्यंत येण्याची ही सहावी वेळ आहे. मुख्यमंत्री असताना तुम्ही जे जे मागितले ते दिले. आता मीदेखील विनंती करतो, विधानसभेत जसा दणदणीत विजय मिळवून दिला, २३२ जागा महायुतीच्या निवडून दिल्या, तसाच नगरपालिकेवरही भगवा फडकवायचा आहे. शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत होय. आता एवढ्या संख्येने जमले, तसे निवडणूक मैदानात तुम्ही ठाम राहिल्यास विरोधकांचे डिपॉझिट गूल झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही शिंदे यांनी केला. प्रचंड विकासकामे केल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत ठेवा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
चोवीस तासात अजितदादांचा राजीनामा झाला नाही तर दिल्ली गाठणार, अंजली दमानियांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
मंत्र दिला, संजय सुधारला
आमदार गायकवाडांविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, संजय कधी कधी कामाच्या ओघात गडबड करतो. त्याची इच्छा असते सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. मी त्याला काही मंत्र देऊन ठेवल्याने तो आता सुधारला आहे. शेवटी बाळासाहेबांचाच तो शिवसैनिक. संजयला एवढेच सांगतो, दररोज एका महापुरुषाच्या पुतळ्यासमोर तू जा. दोन मिनिटे स्तब्ध होऊन त्यांचा इतिहास डोळ्यांसमोर घ्यायचा. मी सांगतो संजय गायकवाडला मागे वळून बघावे लागणार नाही, असेही शिंदे म्हणाले.
