लोकल ट्रेनच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याने मुंबई हादरली आहे. मध्य रेल्वे आज संध्याकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ठप्प झाली होती. यानंतर सुरु झालेल्या ट्रेनने ट्रॅकवर चालणाऱ्या प्रवाशांना धडक दिली. यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय.
नेमकं काय घडलं?
“आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे, त्या माहितीनुसार, सँन्डहर्स्ट रोड स्थानकापासून कल्याणच्या दिशेला तीन व्यक्ती हे रेल्वे रुळावरुन चालत होते. या दरम्यान पाठीमागून एक लोकल ट्रेन आली. यामुळे या लोकांना मार बसला. या तीनही व्यक्तींना हॉस्पिटलला नेलं आहे. या व्यक्तींवर औषधोपचार पोहोचवण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत”, असं जनसंपर्क अधिकारी म्हणाले.
“आपण वारंवार प्रवाशांना विनंती करत असतो की, कृपया रेल्वे ट्रॅक पास करु नका. आतादेखील आम्ही विनंती करतो की, कृपया आपण रेल्वे ट्रॅक क्रॉस करु नये. या घटनेमागे काय कारणे होती, जखमी प्रवासी होते की बाहेरची व्यक्ती होती याची माहिती मिळेल. त्यानंतरच बोलू शकू”, अशी प्रतिक्रिया मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.
Mumbai Local Accident : सँन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू, काही प्रवासी जखमी
“ट्रॅकवरुन गाडी जाते त्यावेळेस गाडीचा वेग खूप जास्त असतो. त्यामुळे त्याची रिअॅक्शन टाईम कमी वेळात थांबवणं किंवा अंधारात थांबवणं शक्य नसतं. त्यामुळे आपण प्रवासी आणि आजूबाजूच्या रहिवाशांना ट्रॅक पास करु नका किंवा ट्रॅकवरुन चालू नका, असं आवहन करत असतो. आपण वारंवार प्रवाशांना विनंती करतो की, ट्र्रॅकवर चालू नये. त्यामुळे इजा पोहोचू शकते”, अशीदेखील प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Mumbai Local : रेल्वे कर्मचाऱ्यांनी मुंबईची लोकल थांबवली, मध्य रेल्वेची वाहतूक 50 मिनिटं थांबली, अखेर…
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तिघांचा मृत्यू?
दरम्यान, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी ऐन गर्दीच्या वेळी संध्याकाळी 5.40 वाजेच्या दरम्यान आंदोलन केलं. या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे विविध रेल्वे स्थानकांवर जवळपास तासभर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली होती. प्रवासी रेल्वेची वाट पाहत थांबले होते. पण लोकल येत नव्हती. अखेर वैतागून काही प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरुन पायी चालत जाण्याचा मार्ग अवलंबला होता. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे हा अपघात घडला, असा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.

