Best new bus routes: बेस्ट उपक्रमाने आजपासून बसमार्गांमध्ये मोठे बदल केले आहेत. काही मार्गांचा विस्तार केला जाईल, तर काही मार्गांवर वातानुकूलित (एसी) बस धावतील.
कोणत्या मार्गांमध्ये बदल होणार?
बॅकबे आगाराहून सुटणारी ए 45 आणि मुंबई सेंट्रल आगारातून सुटणारी ए 49 या दोन्ही मार्गावरील बस आता एमएमआरडीए वसाहत, माहुलऐवजी माहुल गावापर्यंत धावतील. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते शिवडी बसस्थानकापर्यंत धावणारी बस क्रमांक 69 आता वडाळा आगरपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. बसमार्ग 6 मर्यादित आता वातानुकूलित ए 6 होणार असून ही बस टाटा वीज केंद्र ते कुलाबा आगारऐवजी बॅकबे आगारापर्यंत धावेल. वैशालीनगर मुलुंड ते मरोळ आगारापर्यंत धावणारी 307 क्रमांकाची बस आता ए 307 या क्रमांकाने होली स्पिरिट रुग्णालयमार्गे मजास आगारापर्यंत विस्तारित करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.
निवडणूकघोषणा येत्या आठवड्यात; पहिल्या टप्प्यात नगरपालिका, 15 ते 20 जानेवारीदरम्यान मुंबई महापालिकेची रणधुमाळी
घाटकोपर आगार ते आगरकर चौक अंधेरी पूर्वदरम्यान धावणारी ए 533 क्रमांकाची बस गोखले पूलमार्गे अंधेरी स्थानक पश्चिम विस्तारित केली आहे. देवनार आगार ते बोरिवली स्थानक पूर्वदरम्यान धावणारी एसी बस क्रमांक 60 आता ए 458 या नव्या क्रमांकाने धावेल. यासह अन्य काही बसमार्गातही बदल करण्यात आले आहेत. बस मार्ग क्र.ए 207मालवणी आगार ते दहिसर बसस्थानक, बस क्र. ए 295 वांद्रे रेक्लेमेशन बस स्थानक ते टाटा वसाहत, ए 399 ट्राँबे ते मुलुंड महाराणा प्रताप चौक, ए 410 विक्रोळी आगार ते महाकाली गुंफा, बस क्रमांक ए 604 कांजुरमार्ग बस स्थानक पश्चिम ते भांडुप पश्चिम, ए 605 भांडुप स्थानक पश्चिम ते टेंभीपाडा नाका, ए 606 भांडुप स्थानक पश्चिम ते अशोक केदारे चौक या बसमार्गावर वातानुकुलित बस धावत होत्या. त्याऐवजी एसी बस धावणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.
राज ठाकरेंनी पत्रकारांना कसं चकवलं? भरसभेत अॅक्शन करून दाखवली
या बदलांबद्दल बोलताना एका बेस्ट अधिकाऱ्याने सांगितले की हे बदल प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यासाठी केले गेले असून, यामुळे बेस्ट बस अधिक कार्यक्षम पद्धतिनी चालतील.

