एसटीचा ताफा २० हजारांपार नेऊन ‘मागेल त्याला गाडी’ देण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. सद्यस्थितीत पाच हजार साध्या बसगाड्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासाठी टाटा मोटर्सने सर्वांत कमी दराची बोली लावली. यामुळे बसच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. यासह ‘२ बाय २’च्या दोन हजार ६४० आणि ‘३ बाय ३’च्या तीन हजार बसगाड्या दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.
Kainoor Mistry : बोरीवलीत कार पुलाच्या कठड्यावर आदळली, इंडिगो एअरलाईन्सच्या केबिन क्रूचा करुण अंत, 8 वर्षांचा चिमुरडा मायेला मुकलाएकूण २०० व्होल्वो बसमध्ये १७० आसनी बससाठी ७९७.३३ कोटी आणि ३० शयनयान बससाठी १४९.५२ कोटी रुपयांची बोली लागली आहे. २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या आणि साधारण पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी ४५ आसनी बस असतील. रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
दिवसा आणि रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार एसटीची आरामदायी सेवा उपलब्ध होईल. एसटीच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच व्होल्वो बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत, असे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसने, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सोयींमुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग तयार झाला आहे. अधिक भाडे देऊनही हा वर्ग खासगी बसांना पसंती देतो. या प्रवाशांना एसटीकडे वळवण्यासाठी केवळ स्वस्त पर्याय न देता आराम, सुरक्षितता, डिजिटल सुविधा आणि विश्वासार्ह सेवेचा एकत्रित अनुभव देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे, असे ही महामंडळाने स्पष्ट केले.
ST प्रवाशांसाठी महत्त्वाचे! NCMC कार्ड नियमांत बदल, बायोमेट्रिक त्रुटीसाठी आता आधार OTPचाही पर्याय, आजपासून नोंदणी‘आतिथ्या’साठी प्रशिक्षित मनुष्यबळ
प्रवाशांना नव्या बसगाड्या देताना खासगी ट्रॅव्हल्सच्या धर्तीवर प्रवासी अनुभव देण्यात येईल. आतिथ्य व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची मदत घेतली जाणार आहे. प्रवाशांचे स्वागत, स्वच्छता, मूलभूत सुविधा, आवश्यक माहिती आणि सेवांचे व्यवस्थापन यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध केले जाणार आहे.
सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गांना लाभ
राज्यासह आंतरराज्य मार्गांवर खासगी आराम बसला मागणी लक्षात घेऊन मार्ग निश्चित केले जाणार आहेत. प्रवासी संख्या, मागणी, उपलब्ध सेवा, अंतर, प्रवासाचा कालावधी आणि आर्थिक व्यवहार्यता या निकषांचा अभ्यास करून सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गावर व्होल्वो बसगाड्या धावत्या करण्यात येणार आहे.
Electric Shock : आम्ही गमावलेलं मूल परत येणारे का? गणरायाच्या दर्शनावेळी शॉक, चिमुरडीचा करुण अंत, नातेवाईकांचा उद्विग्न सवालडिजिटल बुकिंगवर भर
आरक्षण नव्या व्होल्वो बस सेवेसाठी डिजिटल बुकिंगवर भर देण्यात येणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाइन व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे बसस्थानकावर जाऊन तिकीट काढण्याची गरज राहणार नाही. मोबाइलवरून मार्ग, बसची वेळ आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करता येणार आहे.
