• Mon. Sep 21st, 2026

Crime News: पालकांनो काळजी घ्या! संभाजीनगरातून एकाच दिवशी ३ मुली गायब; पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगवान

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शहर परिसरातून तरुण मुली आणि महिला अचानक गायब होण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. बेगमपुरा आणि जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकाच दिवशी ३ मुली बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या असून, यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.

​१. बेगमपुऱ्यातील काळा दरवाजा परिसरातून कॉलेजला गेलेल्या दोन मुली गायब

पहिली घटना बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किलेअर्क, काळा दरवाजा परिसरात घडली. सुमित्रा सकट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची १८ वर्षीय मुलगी निकिता सकट ही १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास “मी नर्सिंगच्या कॉलेजला जाते,” असे सांगून घरातून निघाली होती. तिच्यासोबत तिच्या ओळखीची एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगीदेखील (रा. पुणे) होती.

​सायंकाळ झाली तरी दोन्ही मुली घरी परतल्या नाहीत. नातेवाईक, मैत्रिणी व सर्व संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा कोणताही सुगावा लागला नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून त्यांना पळवून नेल्याचा संशय असल्याने बेगमपुरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस फौजदार वाडेकर पुढील तपास करत आहेत.

​२. जवाहरनगरच्या विष्णुनगरातून तरुणी घरातून रहस्यमयीरीत्या बेपत्ता

दुसरी घटना जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णुनगर भागात घडली. गजेंद्र वायकोस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वाजेच्या सुमारास त्यांची १८ वर्षीय मुलगी अमृता वायकोस ही घरात कोणालाही काही न सांगता अचानक निघून गेली. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती आढळून आली नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीने तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. जवाहरनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार देगलुर प्रकरणाचा तपास करत आहेत.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed