सुषमा अंधारे यांनी फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत नवा आणि खळबळजनक दावा केला आहे. पीडितेच्या हातावरील आणि पत्रातील हस्ताक्षर जुळत नसल्याचा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सुषमा अंधारे यांना दोन नोटीस
“आजच्या दोन आधी महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला सांगितल्या पाहिजेत. खरंतर हक्कभंग प्रस्तावाच्या संदर्भाने त्यांनी मला माधं मत विचारलं. मी त्यांना माझं मत पाठवून दिलेलं आहे. विधीमंडळाला पाठवलं आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव विधान परिषदेत वाचून दाखवला होता. त्याबाबत माझं स्पष्टीकरण विचारलं होतं. ते स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. या संबंधीची कार्यवाही काय-काय घडलं ते आपल्याला माहिती आहे. अधिवेशनाला अजून वेळ आहे. पण हे सर्व चालू असताना काल अचानक माझ्या घरी पुन्हा एक नोटीस आली. ती हक्कभंगाची नोटीस आहे. फार विशेष आहे. अनिल बोरनारे यांच्या सहीची ती नोटीस आहे. मी अजून हातात घेतली घेतलेली नाही. कारण मी मुंबईत आहे. पण नोटीस ही पुण्यात आलेली आहे. दुसरी घडामोड म्हणजे 50 कोटींच्या दाव्याची नोटीस सुद्धा अत्यंत आपुलकीचं प्रेमपत्र माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. या दोघांचं मी सहर्ष स्वागत करते”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.”माझ्या बोलण्यातून काल एक गोष्ट राहिली होती. मी काल महिला आयोगाच्या भूमिकांबाबत प्रश्न निर्माण केले होते. त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा राहिला होता. एखादी घटना घडल्यानंतर घटनेच्या ठिकाणी असणारा मुद्देमाल लॅपटॉप किंवा फोन जप्त केले जातात. त्याची माहिती प्रचंड गोपनीय असते. ती माहिती न्यायालयाच्या परवानगीनुसार न्यायालयात सादर करायची असते”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
सुषमा अंधारे यांनी थेट पुरावे दाखवले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात स्फोटक पत्रकार परिषद
“एकीकडे आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा महाडिकांसोबत काही संवाद झाला असेल का, महाडिकांचा निंबाळकरांशी झाला असेल का, महाडिकांच्या धुमाळ आणि राहुल धसशी संवाद झाला असेल का, धुमाळ आणि राहुल धसचा, महाडिकचा, बदनेचा किंवा बनकरचा काही संवाद झाला असेल का, याच्या सीडीआरची मागणी करतो. त्या सीडीआरबद्दल कुठलीही माहिती पुढे येत नाही. त्याबाबत कुठलंही तपशील समोर येत नाही. भाजपप्रयोजित काल महिला आयोगाच्या व्यक्ती पत्रकार परिषदेत होत्या. त्यांनी त्यावर काहीच सांगितलं नाही. पण मुलीच्या सीडीआरबद्दल बोलल्या”, असं अंधारे म्हणाल्या.
‘देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचा घात केला’, लक्ष्मण हाके यांचा घणाघात
“पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की, त्या मुलीचा मोबाईल किंवा सीडीआर लीक करायचा अधिकार पोलिसांना कुणी दिला? महिला आयोग कोणत्या अधिकारावर त्याबाबत बोलणी केली. त्यांना अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला ठेवावं की नाही याचा विचार करावं. राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखादी व्यक्ती पीडितेची बदनामी करत असेल तर अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रक्रिया करावी”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

