Satara Women Death Hotel CCTV Footage : सातारा फलटणमधील डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. याचदरम्यान, ज्या हॉटेलमध्ये या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली त्या हॉटेलमधील 27 सेकंदाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
फलटणमधील मधुदीप या हॉटेल मालकाने आज सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयत डॉक्टर तरुणी हॉटेलच्या रजिस्टरमध्ये आपलं नाव लिहिताना दिसत आहे. नाव लिहिल्यानंतर तरुणी हॉटेलमधील रुमची चावी घेऊन जाते. खोलीचा दरवाजा उघडण्याचा दोन-तीनवेळा प्रयत्न केल्यानंतर अखेर दरवाजा उघडतो आणि तरुणी खोलीत प्रवेश करते. यानंतरच मयत डॉक्टर तरुणी हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या करते.
Satara Crime: डॉक्टर तरुणी रात्री दीडला आली, बारामतीला जायचंय सांगून…; हॉटेल मालकाने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
वकिलांचा सल्ला घेऊन रुम उघडला
मधुदीप हॉटेलचे मालक दिलीप भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले की, ‘या प्रकरणात आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. सुरुवातीला पोलिसांना बोलावले पण त्यांना यायला उशीर होत असल्यामुळे आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन रुम उघडला. ही हत्या नाही तर आत्महत्या आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी गेले 30-35 वर्ष झाले सामाजिक कार्यात काम करतोय. चांगले निर्णय घेतले, त्याच्यामुळे काही लोक मला बदनाम करतात. आम्ही 23 ऑक्टोबरला मध्यरात्री दीड वाजता हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीला खोली दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता तिने कॉल केला होता, तोपर्यंत ती व्यवस्थित होती. रात्री हॉटेलमध्ये चेक इन करताना तिनं सांगितले होतं की, मला सकाळी साडेनऊ वाजता बारामतीला जायचं आहे. परंतु दुसऱ्या दिवशी दुपारी संशय आला त्यावेळेस आम्ही वकिलांच्या सल्ल्यानुसार दरवाजा उघडला, त्यावेळी तिने गळफास घेतलेला पाहायला मिळालं.’
Raigad News : खोलीचं दार बराच वेळापासून बंद, दरवाजा उघडताच धक्कादायक दृश्य; 23 वर्षीय तरुण पुजाऱ्यानं…
डॉक्टर तरुणीच्या हातावर सुसाईड नोट
मृत डॉक्टर तरुणीच्या हातावर सुसाईड नोट आढळली होती. या सुसाईड नोटमध्ये तरुणी डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलं होतं. त्यात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहिलेलं. पोलीस उपनिरीक्षक बदनेने चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये उल्लेख होता. तसंच प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं होतं.

