Ahilyanagar News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभागाने आता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी एकच मोबाईल नंबर देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना आता अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तरी…
शेतकऱ्यांना संपर्कात अडचणी निर्माण होत असल्याने घेतला निर्णय
यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय तसेच मंडळ सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्व पदांवर हा निर्णय लागू होणार आहे. अधिकारी किंवा कर्मचारी यांची बदली झाल्यानंतर मोबाईल नंबर बदलल्याने शेतकऱ्यांना संबंधित माहिती मिळण्यात, तक्रारी नोंदविण्यात, तसेच योजनांबाबत मार्गदर्शन घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याने, ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
Air India Marathi Row : भिकारड्याने पैशांसाठी महिलेचा जॉब घालवला, याला कोंबडा नाही बनवला तर… विमानातील मराठी वादानंतर मनसेचा इशारा
राज्यभर एकसमान प्लॅन लागू करण्यात आला, कृषी विभागामार्फत नियंत्रित केला जाणार
या सुविधेमध्ये कायमस्वरूपी नंबरसाठी जिओ कंपनीचे पोस्टपेड सिम कार्ड देण्यात येणार असून, यात दर महिन्याला 60 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल, 3 हजार SMS अशी सुविधा उपलब्ध राहणार आहे. राज्यभर एकसमान प्लॅन लागू करण्यात आला असून तो थेट कृषी विभागामार्फत नियंत्रित केला जाणार आहे. यासंबंधीचा शासन निर्यणही आता जाहीर करण्यात आला आहे.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
विशेष म्हणजे, हा मोबाईल नंबर फक्त शासकीय कामकाजासाठीच वापरता येणार आहे. गुगल पे, फोन पे, बँकिंग व्यवहार किंवा कोणत्याही वैयक्तिक कामासाठी या सिमचा वापर करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांपर्यंत तात्काळ माहिती, सेवा आणि तक्रार निवारण प्रणाली अधिक प्रभावी होण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या निर्णयाचे शेतकऱ्यांकडूनही स्वागत करण्यात आले आहे.

