Madha News: माढा तालुक्यातून मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजीत सिंह शिंदे हे २९ तारखेला मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आजी-माजी आमदार मोहोळचे यशवंत माने, सांगोल्याचे दीपक आबा साळुंखे, सोलापूरचे दिलीप माने, मोहोळचे राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता अजित पवार गटाचे माढ्यातून विधानसभा निवडणूक लढवणारे रणजीत सिंह शिंदे हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
कृषी अधिकारी व शेतकऱ्यांतील समन्वयासाठी कृषी खात्याचा महत्वपूर्ण निर्णय, काय आहे हा निर्णय, कसा होणार फायदा?
रणजीत सिंह शिंदे हे माजी आमदार बबन दादा शिंदे यांचे सुपुत्र आहेत. बबन दादा शिंदे हे मागील तीस वर्ष माढा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत होते, त्यानंतर मागील विधानसभेला त्यांनी त्यांचा मुलगा रंजीतसिंह शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली होती. परंतु आता ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाल्याने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपने ऑपरेशन लोटस सुरू करून आजी माजी आमदारांना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या भाजपकडे राहाव्यात यासाठी या सर्व पक्षप्रवेशाची सुरुवात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली होती. याला मागील काही थोडे दिवस माध्यमांमध्ये याची मोठी चर्चा असल्यामुळे या पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील पक्षप्रवेश सुरू करण्यात आले आहेत.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
त्यातच माढा तालुक्याचे रणजीतसिंह शिंदे हे आता येत्या 29 तारखेला मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यामध्ये किती तथ्य आहे हे 29 तारखेलाच स्पष्ट होणार आहे.

