• Fri. Sep 11th, 2026

‘माझं मन मला सांगतंय, CM हे…’; देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीवर धंगेकरांचं मोठं विधान

ByMH LIVE NEWS

Oct 25, 2025
‘माझं मन मला सांगतंय, CM हे…’; देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीवर धंगेकरांचं मोठं विधान
पुणे 
शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंगच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या 8 दिवसापासून धंगेकर यांनी मोहोळ यांच्या विरोधात आरोपांची मालिकाच सुरु ठेवली आहे. यातच आता काल रात्री उशिरा मुरलीधर मोहोळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीवर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.गतिमान सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जैन समाजासह सर्वांनीच पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या नावावरच या लोकांना मतदान केलं गेलं. पण परंतु जैन मंदिर असं गतिमान पद्धतीने हडप करण्यात आलं याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. याचाच जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोहोळ यांना बोलावलं असेल, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
जैन धर्मियांच्या भावना तीव्र आहेत त्यांच्यामध्ये असंतोष आहे. त्यामुळे मोहाळांची झाडाझडती येण्यासाठीच फडणवीस आणि त्यांना बोलावलं असेल. देवेंद्र फडणवीस चुकीच्या लोकांना सोडणार नाहीत. माझं मन मला सांगत आहे, देवेंद्र फडणवीस हे मुरलीधर मोहोळ यांच्यावर कारवाई केल्याशिवाय सोडणार नाहीत. चाणक्ष राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते ते नक्कीच कारवाई करतील, असा विश्वास देखील रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, एकीकडे रवींद्र धंगेकर भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांवर टीका करत आहेत. निलेश घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष केलं तर आता जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहारा प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांच्यावर रवींद्र धंगेकर यांनी टीकेची राळ उठवली आहे. अशात दुसरीकडे मात्र धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची तोंड भरून स्तुती केली आहे. धंगेकर यांच्या टिकेनंतर महायुतीत बेबनाव झालेला दिसत असताना फडणवीसांवर स्तुतीसुमणे उधळल्याने नवीन चर्चांना उधाण आल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed