• Mon. Jun 15th, 2026

    ‘आम्ही कुणालाही सोडणार नाही, कठोर कारवाई करणार’, महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी -CM देवेंद्र फडणवीस

    ByMH LIVE NEWS

    Oct 25, 2025
    ‘आम्ही कुणालाही सोडणार नाही, कठोर कारवाई करणार’, महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी -CM देवेंद्र फडणवीस
    मुंबई
     सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी प्रशांत बनकर याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण यांच्याकडून संशयित आरोपी प्रशांत बनकर याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानं प्रशांत बनकर याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचदरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री ( Devendra Fadnavis ) यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

    सातारा फलटणमधील घटना ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या घटनेत महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी आम्ही कुणालाही सोडणार नाही. या घटनेत जो कुणी आरोपी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, संबधित पोलीस अधिकाऱ्यांना कालच निलंबित करण्यात आलं आहे. विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

    संशयित आरोपी प्रशांत बनकरला पोलीस कोठडी

    फलटण येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात सरकारी वकील महाले यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. तर, आरोपी प्रशांत बनकर याचे वकील सुनील भोंगळे यांनी संशयित आरोपी प्रशांत बनकर याला कमीत कमी पोलीस कोठडी द्यावी, असा देखील युक्तिवाद केलेला होता. यावर न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    प्रशांत बनकरला पुण्यातून अटक

    फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. घटनेनंतर पोलिसांची पथके दोन आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती. युवतीने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याने मानसिक व शारीरिक छळ केल्याचं लिहिलं होतं.

    गोपाल बदने याचा शोध सुरु

    महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय बदने याचं काल शेवटचं लोकेशन पंढरपूर होतं. तोही बीड परिसरातला असल्यानं साताऱ्यावरून बीडकडे जाताना त्याने बहुदा पंढरपूर परिसरात फोन बंद केलेला असावा, अशी माहिती आहे. कालपासून पोलिसांच्या सर्व टीम त्याच्या गाडीसह शोध घेत होते. मात्र तो आज अखेर मिळून आलेला नाही. गोपाल बदने याला कधी अटक होणार हे पाहावं लागेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed