सातारा
गोपाळ बदनेचे लास्ट लोकेशन हे पंढरपूर दाखवल्यामुळे सध्या पंढरपूरमधील पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून तपासाची चक्रे वेगाने फिरली आहेत. आरोपी गोपाळ बदनेचे शेवटचे मोबाईल लोकेशन पंढरपुरात असल्याचे समोर आल्याने पंढरपूर पोलिसांकडून गोपाळ बदनेचा शोध सुरु करण्यात आला आहे. काल रात्री पासूनच या संदर्भी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. चारही पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी याबाबत सतर्क झाले असून आरोपी गोपाळ बदने पंढरपुरात असल्याच्या संशयावरून त्याचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.दरम्यान, पीएसआय बदनेने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला असे तरुणीने तिच्या हातावर लिहिले होते. तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरने मानसिक व शारिरीक त्रास दिल्याचं तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये म्हटलं होतं. हा प्रकार उघड झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यापैकी प्रशांत बनकरला आज पहाटे पोलिसांनी अटक केली आहे. तो एका फार्महाऊसवर लपून बसला होता. प्रशांतनंतर पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी पीएसआय गोपाल बदनेचा मागोवा काढला आहे.
सगळं लुटलं, स्वप्न उद्ध्वस्त… सराफाच्या फसवणुकीनं महिलांच्या डोळ्यात अश्रू!
पोलिसांना बदनेचं लोकेशन सापडलं असल्याने आता त्याच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाणार हे निश्चित झाले आहे. पोलिसांना बदनेचं लोकेशन सापडलं असल्याने आता त्याच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर गोपाल बदनेला निलंबित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपुरात आढळलं आहे. पोलिसांकडून शोधकार्य सुरु आहे. दरम्यान, पोलीसच भक्षक झाला असल्याने गृहविभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे, विरोधकांनी सरकारवर याप्रकरणावरून टीका केली आहे.
