• Wed. Jun 17th, 2026
    छत्रपती संभाजीनगरात मोफत धान्याचा काळाबाजार; 17 लाखांचा धान्यसाठ्यासह मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

    ​​Chhatrapati Sambhajinagar News: या प्रकरणात दोन विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून, १७ लाख सहा हजार ५०० रुपयांचे रेशन आणि मोफत धान्यांचा साठ्यासह वाहने अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    मोफत धान्य काळाबाजार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: रेशनिंगसाठी तसेच महिला व बालकल्याण विभागातील शालेय पोषण आहाराअंतर्गत लहान मुलांसाठी तसेच गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी मोफत वाटपासाठी असलेला धान्यसाठा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई १३ जून रोजी सकाळी ११.३० ते १३ जून रोजी सायंकाळी ६.४० वाजेच्या दरम्यान किराडपुरा भागातील एमआर फंक्शन ऑल येथे करण्यात आली.

    या प्रकरणात पोलिसांनी समीर कुरेशी (रा. चिकलठाणा), फरदीन गणी पठाण (रा. चिकलठाणा) आणि फहाद लईक शुत्तारी (रा. किराडपुरा) या तिघांना ताब्यात घेतले.

    या प्रकरणात पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमआर फंक्शन हॉलच्या जवळ एकागोडावूनमध्ये कलीम छोटू कुरेशी याने रेशनिंगचे धान्यांचा साठा करून ठेवला आहे. त्याचे नातेवाईक समीर कुरेशी, आवेज कुरेशी आणि फहाद शुत्तारी हे रेशनिंगचे धान्य काळा बाजारात विक्रीसाठी लोड करून घेऊन जाणार आहेत.

    Maharashtra TimesAccident News: कॉलेजच्या एका मेसेजमुळे प्रतीक्षा पुण्यातून आली; पण संभाजीनगरमध्ये मृत्यूने गाठलं, बॉडी पाहून मैत्रीण बेशुद्ध!
    या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (१३ जून) साडेअकरा वाजता वाजता छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी रेशन दुकानातील अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणारे एक किलो वजनाचे साडेचार हजार रुपये किमतीचे १४५ साखर पॉकिट, चार लाख ३९ हजार ८३० रुपयांचे ३६२ गोण्या, ७५ हजार ६०० रुपयांचे ६० गोण्या गहू, साडेचार हजार रुपयांच्या तीन गोण्या ज्वारी, ३६ हजार २७० रुपये किमतीच्या ६२ गोण्या मका, पाच हजार रुपये किमतीचा वजन काटा, नऊ हजार ६०० रुपयांचे शंभर लिटर डिझेल आणि दहा लाख रुपयांचे आयशर ट्रक (एमएच १८ बीएच ७७२०) असा एकूण १५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    या प्रकरणी जिल्हा सहायक पुरवठा अधिकारी संदीप शिंदे यांच्या तक्रारीवरून समीर बाबर कुरेशी, फहाद लईक शुत्तारी, फरदीन गणी पठाण; तसेच आवेज कुरेशी आणि कलीम छोटू कुरेशी आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आवेज कुरेशी आणि कलीम छोटू कुरेशी सह अन्य साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरूआहे.

    Maharashtra Timesपळून जाऊ असा दम देणाऱ्या नवरीला दामिनी पथक येताच कापरं भरलं, हायव्होल्टेज ड्राम्यानंतर बालविवाह रोखला
    कारवाई करताना याच भागात अन्य एका खोलीत महिला व बाल कल्याण विकास प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील सहा महिने ते तीन वर्षे वयाच्या मुलांसाठी; तसेच गरोदर व स्तनदा माता यांना त्यांची शारीरिक झीज भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एनर्जी डेन्स तूरडाळ खिचडी प्रीमिक्स व एनर्जी डेन्स मूगदाळ खिचडी प्रीमिक्स; तसेच मल्टिमिक्स सीरियल एंड प्रोटिन्स प्रीमिक्स आणि मल्टिमिक्स सीरियल्स एंड प्रोटिन्स प्रीमिक्स मोफत देण्यात येते. हे सर्व पदार्थ पॅकिंग फोडून गोण्यांमध्ये भरून विकण्यात आले.

    ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, प्रवीण पाथरकर, दिशेन बन, दीप तायडे, प्रदीप दंडवते, योगेश नवसारे, विजय निकम, विनोद परदेशी, राहुल बंगाळे, जालिंदर गोरे, अरुण भिसे, दिनकर आवारे, अभिषेक बाठे, सागर शेंडे, माया माळी, मनीषा नरोडे, संदीप शिंदे व महिला बालकल्याण विकास प्रकल्प अधिकारी गणेश पुंगळे यांनी केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा