• Thu. Jun 18th, 2026

    पुनर्बांधणीच्या कामांदरम्यान पुणे विमानतळ सुरू राहणार, जुनं टर्मिनलही लवकरच खुलं करणार; प्रवाशांना मोठा फायदा होणार

    पुनर्बांधणीच्या कामांदरम्यान पुणे विमानतळ सुरू राहणार, जुनं टर्मिनलही लवकरच खुलं करणार; प्रवाशांना मोठा फायदा होणार

    Pune Airport Terminal: विमानतळावरील जुन्या टर्मिनलचं काम आता पूर्ण झालं आहे. लवकरच ते प्रवासासाठी उघडण्यात येणार असून आता धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे.

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: भारतीय हवाई दलाच्या अंतर्गत असलेली देशातील जोधपूर, श्रीनगर, आदमपूर आणि पुणे विमानतळ येत्या वर्षांत धावपट्टी दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या कामांसाठी काही दिवस बंद केली जाणार होती. मात्र, पुणेकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे पुणे विमानतळ आता बंद केले जाणार नाही. धावपट्टीच्या देखभालीसाठी विमानतळ बंद असलेल्या सकाळच्या दोन तासांमध्येच आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

    अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण

    भारतीय हवाई दलाकडून लष्करी विमानतळाची धावपट्टी दुरुस्ती ही उड्डाण सुरक्षितता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी अत्यावश्यक असल्याने धावपट्टी डागडुजी व नूतनीकरणाचे काम केले जाते. या वर्षांत चार विमानतळांचे हे काम करण्याचे नियोजन होते. त्यानुसार जोधपूर विमानतळाचे काम मार्च व एप्रिल महिन्यात करण्यात आले; तर, श्रीनगर विमानतळ ऑगस्ट महिन्यात बंद केले जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये आदमपूर विमानतळ कामकाजासाठी बंद करण्याचे नियोजन आहे. मात्र, आतापर्यंत पुणे विमानतळ कधी बंद केले जाणार याचे वेळापत्रक जाहीर केलेले नव्हते. यावर पुणे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी धावपट्टी व इतर कामांसाठी विमानतळ बंद राहणार नसल्याचे स्पष्ट केले.

    Maharashtra TimesMumbai-Pune High Speed Rail: मुंबई ते पुणे अवघ्या 48 मिनिटांत! सात नव्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांना वेग; रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

    ‘पुणे विमानतळावरून दर रोज सुमारे २०० विमानांची ये-जा होते. विमानतळ बंद केल्यास प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने भारतीय हवाई दलाकडे कामासाठी सकाळी विमानतळ बंद असलेल्या दोन तासांच्या वेळात हे काम करण्याची विनंती करण्यात आली होती. हवाई दलाने दोन तासांत काम पूर्ण करण्यास मान्यता दिली आहे. पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. सुरक्षा विषयक उपकरणे बसवण्याचे काम शिल्लक आहे. त्यानंतर सुरक्षा विषयक तपासणी केली जाईल. त्यानंतर जुने टर्मिनल प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहे, असे पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले.

    वाहनांना पाचशे रुपये दंड

    पुणे विमानतळाच्या आगमन प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांना घेण्यासाठी आल्यानंतर अनेक वाहने १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळउभी राहण्यास परवानगी नाही; पण अनेक वाहने अर्धा तासांपर्यंत तिथे थांबतात. अशा वाहनांना नियमांप्रमाणे पाचशे रुपये दंड करण्याचे नियोजन आहे.

    Maharashtra TimesPune Ring Roadच्या नियोजनाचा खेळखंडोबा! रस्ते विकास महामंडळाकडून ११७ गावं पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; आराखडा रखडणार?

    ‘बर्ड हिट’ रोखण्यासाठी उपाययोजना सुरूच

    ‘पुणे विमानतळावर विमानाला बर्ड हिटच्या घटना रोखण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. धावपट्टी परिसरात गवत कापून स्वच्छता करण्यात – आली. पक्ष्यांना धावपट्टीपासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा लावण्यात आल्या आहेत,’ – अशी माहिती संतोष ढोके यांनी दिली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा