Women Doctor Suicide : काकांच्या आरोपांनुसार, पुतणीवर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जात होता, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. या घटनेनं साताऱ्यासह बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
सुट्टी घेऊन ती मूळ गावी जाणार होती
मयत डॉक्टर तरूणी ही दोन वर्षांपासून मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होती, मयत डॉक्टर तरूणी मूळची बीड जिल्ह्यातली आहे. दहावीपर्यंत शिक्षण बीड शहरातल्या शाळेत घेतलं. मृत डॉक्टर तरूणीला चार सख्खी भावंडे आहेत. आई वडील शेतकरी असून त्यांची परिस्थिती बेताची, तरी तिने चिकाटीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. नातेवाईक उच्चशिक्षित असल्यानं तिनं शिक्षणाचं महत्व जाणलं. महाबळेश्वरमध्ये तिला पहिली पोस्टिंग मिळाली होती, 6 महिने कंत्राटी पद्धतीने काम केलं, दीड वर्षांपूर्वी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली होती. पुढच्या आठवड्यात सुट्टी घेऊन ती मूळ गावी जाणार होती. दरम्यान, ही डॉक्टर तरूणी अविवाहित होती.
बॉयफ्रेंडच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील तरुणीने प्राण सोडले; एका शंकेनं घेतला दोघांचा जीव
पोस्टमार्टमची ड्युटी लागते आणि
मृत तरुणीनं घरी न सांगता हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ज्यांच्याकडून त्रास झाला त्यांची नावं तिने हातावर लिहिलेली आहेत. ‘आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की, आमच्या बहिणीला न्याय मिळावा. तिने याबाबत जास्त कोणाला सांगितलं नव्हतं, तिची एक दुसरी बहीण मेडिकल ऑफिसर आहे. तिला तिने राजकीय दबाव आणि पोलिसांचाही दबाव असल्याचा सांगितला होता. पोस्टमार्टमची ड्युटी लागते आणि त्यावेळी त्यांच्या म्हणण्यानुसार रिपोर्ट द्यावे लागतात, दबाव येतो ते तिने सांगितलं होतं. दोन महिन्यापूर्वी तिने या संबंधीच्या पाठपुरावा करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र लिहिलं होतं, त्यामध्ये तिने स्पष्ट उल्लेख केला होता. खासदारांच्या दोन पीएने फोन लावले होते, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक याच्यावर आरोप केलेले आहेत, त्याचबरोबर कोणीतरी महाडिक म्हणून आहेत त्यांची नावं तिने त्या पत्रामध्ये लिहिलेले आहेत, गुन्हा दाखल करण्यासाठी तिने अर्ज दिला होता, पण गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला नव्हता’, असंही भावाने सांगितलं आहे.

