राज्यभरातील विविध भागांत दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबई आणि उपनगरातही दिवाळीत अचानक पावसाने हजेरी लावली. मुंबईत दुपारपर्यंत ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशी परिस्थिती होती. दिवाळीच्या खरेदीदरम्यान आलेल्या पावसाने व्यापााऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे नागरिकांचीही मोठी तारांबळ उडाली. राज्यभरात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शिवाय नोव्हेंबर महिन्यातही पाऊस पडेल असं सांगण्यात आलं आहे.
Breaking News 24th October 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी
