BEST 134 Buses: दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, बेस्टने भाऊबीजेच्या दिवशी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 134 अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहर व उपनगरांना जोडणारे विस्तारित मार्ग
बेस्टच्या या विशेष बसेस दिवाळीच्या गर्दीचा विचार करून मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांसह ठाणे, मिरा रोड आणि भायंदर या भागांत धावतील. ठाणे विभागात मॅरेथॉन चौक, कोपरी, कॅडबरी जंक्शन आणि डडलानी पार्क हे प्रमुख पिकअप पॉइंट्स निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गांवर वाढीव बसेस सुरू केल्याने प्रवाशांना वेळेवर व सोयीस्कर प्रवास करता येईल, अशी अपेक्षा आहे.
Mumbai Crime : काशिमीरा परिसरात मोठा राडा, 25 रिक्षा फोडल्या, मुलींची छेड काढली, मंत्री प्रताप सरनाईकांना बांगलादेशी असल्याची शंका
नवी मुंबईतही वाढीव सेवा
नवी मुंबईतील प्रवाशांसाठीही बेस्टने खास नियोजन केले आहे. कोपऱखैराणे, नेरुळ, ऐरोली, घनसोळी गाव आणि सीबीडी बेलापूर अशा प्रमुख ठिकाणांहून वाढीव बसेस धावणार आहेत. या बसेस सणाच्या काळात रेल्वेवरील गर्दी कमी करण्यास मदत करतील आणि रोजच्या प्रवासात आरामदायी पर्याय ठरतील.
भाऊबीजेला शहरात मोठ्या प्रमाणावर प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनाने वाहतूक निरीक्षक आणि परिवहन अधिकारी प्रमुख बसस्थानके, रेल्वे डेपो आणि गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अधिकारी बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी काम करतील.
जरांगेंच्या बालेकिल्ल्यात छगन भुजबळांचा एल्गार, ओबीसींच्या मेळाव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
सणासुदीतील प्रवास अधिक सोयीस्कर
दिवाळीच्या सुट्टीत मुंबईत अनेक जण आपल्या मूळगावी जातात तर काहीजण शहरात राहून नातेवाईकांच्या भेटीगाठी घेतात. अशा काळात बेस्टच्या वाढीव सेवेमुळे प्रवाशांना सकाळपासून रात्रीपर्यंत वारंवार बस सुविधा मिळणार आहे. त्यामुळे ऑटो किंवा टॅक्सीच्या तुलनेत बस प्रवास स्वस्त, सुरक्षित आणि वेळेवर होण्याची शक्यता अधिक राहील.

