Wardha man sets house on fire: वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी गावात दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पत्नीशी झालेल्या वादातून संतापलेल्या पतीने स्वतःच्या घराला आग लावली. यात घर आणि दुचाकी जळून खाक झाली.
ही घटना वर्धा जिल्ह्यातील खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आंजी मोठी गावात गुरुवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन ठाकरे असे संबंधित व्यक्तीचे नाव असून तो रोजंदारीवर काम करत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. हे व्यसन वाढताच घरातील वातावरण तापू लागले होते आणि पती, पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे.
Pune Crime : पुण्यात जोडपं लॉजवर गेलं, रुममध्ये बर्थडे सेलिब्रेशन, पण केक कापलेल्या चाकूनेच चिरला प्रेयसीचा गळा; नेमकं काय घडलं?
अखेर पत्नीने सततच्या भांडणाला कंटाळून घर सोडले, आणि त्यामुळे गजानन ठाकरेवर मानसिक तणाव आला. पत्नी निघून गेल्यानंतर तो अधिकच मद्यधुंद राहू लागला. दारूचे अतिसेवन केले आणि रागाच्या भरात त्याने आपल्या राहत्या घरालाच आग लावली. काही क्षणांतच आग भडकली आणि संपूर्ण घर जळून खाक झाले.
घरातील कपडे, धान्य, वीज साहित्य, फर्निचर, भांडी, तसेच घरासमोर उभे असलेले दुचाकी वाहनही पूर्णतः जळून राख झाले. आग एवढी भीषन होती की ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सर्वांनी मिळून पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु घरातील सर्व साहित्य भस्मसात झाल्यानंतरच आग नियंत्रणात आली.
गौतमी पाटीलच्या आरोपांना मरगळे कुटुंबियांचे उत्तर, काय म्हणाले?
घटनेची माहिती मिळताच आंजी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद सानप, तसेच हवालदार दिनेश धवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून घटनेची नोंद खरांगणा पोलीस ठाण्यात केली. ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

