Beed Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. बीडमध्ये तर याचं प्रमाण जास्तीच वाढत चाललं आहे. अशीच एक संतापजनक घटना शिरुर तालुक्यात घडली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर काही अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला आहे. त्यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
ही धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये घडली. मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. टोळक्याच्या हातात दांडगे, कोयते, कुऱ्हाडी होत्या आणि त्यांनी कुटुंबातील महिलांवर अमानुष हल्ला केला.
Beed News: बीड जिल्हा कारागृहात बळजबरी धर्मांतराचा प्रयत्न? जेलरवरील आरोपांमुळे खळबळ!
महिलांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, मदतीसाठी किंकाळ्या फोडल्या, पण टोळक्याने मारहाण सुरुच ठेवली. थेट डोक्यावर, पाठीत आणि पायांवर वार करण्यात आले. या मारहाणीत सर्व महिला रक्तबंबाळ झाल्या. जखमी महिलांनी कसाबसा पोलीस ठाण्याचा रस्ता धरला आणि शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत जखमींना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून सध्या तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका महिलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
नळाला पाणी आलं, मोटार लावायला गेल्या अन् जोराचा आवाज… घरातच विवाहितेचा हादरवणारा अंत
प्राथमिक माहितीनुसार, अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता? असे म्हणत टोळक्याने सतीश भोसलेच्या कुटुंबाला जबर मारहाण केल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ‘अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता?’, असं म्हणत टोळक्याने सतीश भोसलेच्या कुटुंबाला जबर मारहाण केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. शिरूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

