Gulabrao Patil: राज्यात मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबताना दिसत नाहीत. आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुष्काळावरून केलेल्या वक्तव्याने पुन्हा वाद निर्माण केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केलं आहे. दुष्काळ पडला तरी आणि नाही पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात, असं ते म्हणाले आहेत.
Beed News: बीड जिल्हा कारागृहात बळजबरी धर्मांतराचा प्रयत्न? जेलरवरील आरोपांमुळे खळबळ!
गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणालेत?
“लोक दुष्काळ पडला तरी पुढाऱ्यांना शिव्या देतात आणि दुष्काळ नाही पडला तरीही पुढाऱ्यांना शिव्या देतात. शिव्या ऐकणं हाच आम्हा पुढाऱ्यांचा धंदा आहे. त्यामुळे ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यानेच आमदार व्हावं”, असं वादग्रस्त वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “आम्ही पण कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही. आम्ही सुद्धा संघर्षातून वर आलेलो आहोत. आम्हाला लोकांनी गद्दारच करून टाकलेलं आहे. आम्ही बदनामीचा विचार करत नाही. आम्ही फक्त एवढाच विचार करतो की, आम्ही लोकांच्या सेवेकरता काम करतो.” ते जळगावमधल्या अमळनेरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, नुकतचं राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगावात भाषण करताना शेतकरी कर्जमाफीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन टीकेची झोड उठली होती.
गौतमी पाटीलच्या आरोपांना मरगळे कुटुंबियांचे उत्तर, काय म्हणाले?
बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य काय होतं?
“लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचं म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीला आश्वासन देतो. कुठे काय मागायचं हे लोकांनी ठरवायला पाहिजे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाई सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितलं की, आमच्या गावाला जो निधी आणून देणार त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागावं ते ठरवावं ना. अनिल भाईंनी आजची वेळ घालवण्यासाठी देऊन टाकू म्हटलं. मित्रांनो मागणाऱ्यांनी काय मागवायचं ते ठरवावं. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचं म्हणून आम्हीदेखील आश्वासन देतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे”, असं बाबासाहेब पाटील म्हणाले होते.

