राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी कंबर कसली आहे. आता शिवसेना उबाठा गट आणि मनसे यांची युती होत असल्याची माहिती आहे. बीएमसी निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. हिंदी सक्तीविरोधात दोन्ही भाऊ एकत्र आले होते, एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यामुळे आता दोघांच्या युतीचे संकेत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांनी पूर परिस्थितीनंतर सरसकट मिळाली नसल्याने, अनेक शेतकऱ्यांना मदतीच्या यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
Maharashtra Live News 11 October 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी
