Buldhana Crime : जिल्ह्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विवाहितेने 4 वर्षांच्या मुलीसह आयुष्य संपवलं. या घटनेने परिसरात खळहळ व्यक्त होत असून महिलेने मुलीला घेऊन इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड येथील 28 वर्षीय विवाहिता आणि तिची चार वर्षीय मुलगी 29 सप्टेंबर रोजी घरात कोणालाही काहीच न सांगता निघून गेली होती. त्यानंतर त्यांचा शोध सुरू होता. दोन दिवसानंतर या माय-लेकीचा मृतदेह मराठवाड्यातील तळणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या पूर्णा नदी पात्रात आढळला असल्याची घटना उघडकीस आली.
Jalgaon News : देवीचं दर्शन घेऊन घरी निघाले, वाटेत पती-पत्नीसोबत अनपेक्षित घटना; दुचाकीसमोर गाय आली आणि… महिलेचा दुर्दैवी शेवट
तालुक्यातील देवखेड येथील निळकंठ भोसले यांची पत्नी गीता निळकंठ भोसले, वय वर्ष 28, आणि मुलगी प्रियांशी भोसले वय 4 वर्ष, 29 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती. त्यानंतर याबाबतची तक्रार किनगाव राजा पोलीस स्टेशनला दिली होती. यानंतर या माय-लेकीचा दिवसभर परिसरात आणि नातेवाईकांकडून शोध घेतला गेला पण कोणताच थांगपत्ता लागला नव्हता.
Ratnagiri News : महिला घरातून अचानक गायब, पुलाजवळ पर्स आणि चप्पल दिसली, शोधाशोध केली आणि… रत्नागिरीत धक्कादायक घटना
अखेर 1 ऑक्टोबर रोजी या माय-लेकीची तळणी पोलीस स्टेशन हद्दीतील वाघाळा येथील पूर्णा नदीच्या पात्रात मुलीचा तर किरला येथे तिची आई अशा दोघींचा मृतदेह दिसला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून सदर मायलेकींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात मंठा येथे नेले आहे. याबाबत किनगाव राजा पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास ठाणेदार संजय मोरतोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शेळके करत आहेत.
केडीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू प्रकरण, शक्तिधाम रुग्णालयात काय घडलं?
महिलेने मुलीसह उचललं टोकाचं पाऊल –
28 वर्षीय या विवाहितेने आपल्या चिमुकलीसोबत घरातून रात्रीच्या सुमारास निघून टोकाचं पाऊल उचललं. महिलेने मुलीसह नदीपात्रात स्वतःचा जीव दिला. आपल्यासोबत तिने चार वर्षीय चिमुकलीलाही संपवलं. पण महिलेने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

