गुंड निलेश घायवळ नेमका कुठे पळाला आहे याची माहिती आता समोर आली आहे. निलेश घाटवळ हा आता स्विर्त्झलंडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ सध्या स्विर्त्झलंडमध्ये असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी संबंधित विभागांकडे केलेल्या चौकशीत तो स्विर्त्झलंडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोथरूड पोलिसांनी घायवळसह त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली आहे. या टोळीवर खून, दरोडा, मारामारी आणि खंडणीसारखे अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत. गेल्या आठवड्यात टोळीतील सराईत गुन्हेगारांनी तरुणावर गोळीबार केला आणि एका तरुणावर धारदार हत्याराने हल्ला केला. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले होते.
या प्रकरणी पोलिसांनी तपास केल्या असता घायवळ पुणे आणि नगर या दोन्ही ठिकाणी नसल्याचे दिसून आले. तो गुन्ह्याचा कट रचून गुन्हा घडण्यापूर्वीच परदेशात निघून गेल्याचे समजले. तसेच, घायवळला मिळालेल्या पासपोर्टबाबतही पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, निलेश घायवळ विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. बनावट वाहन नंबरप्लेट वापरल्याबद्दल निलेश घायवळ विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यात गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या आहेत. या टोळ्यांना मुळासकट नष्ट करण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांवर आहे. गणेशोत्सव काळात पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडालेला बघायला मिळाला होता. आंदेकर टोळीने आयुष कोमकर या तरुणाची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या घटनेआधी काहीच दिवसांपूर्वी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न उधळून लावला होता. असं असताना हत्येची घटना घडल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
ही घटना ताजी असतानाच पुण्याच्या कोथरुड परिसरात रात्रीच्या वेळी गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी रस्ता दिला नाही या क्षुल्लक कारणावरुन गोळीबार झाल्याची घटना घडली होती. गोळीबार करणारे हे निलेश घायवळ गँगचे आरोपी होते, अशी माहिती समोर आली. या आरोपींनी गोळीबार केल्यानंतर त्याच मार्गावर पुढे आणखी एकावर कोयत्याने हल्ला केला होता. या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पण या आरोपींचा म्होरक्या निलेश घायवळ हा विदेशात पळाला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा