Raigad Tractor Accident : रायगड जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ट्रॅक्टरमधून ग्रिट वाहून नेत असताना स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टर नदीच्या पूलावरुन पलटी झाला आणि त्याच्याखाली दबून चालकाचा मृत्यू झाला आहे.
कर्जत तालुक्यातील टाटा पावर हाऊस येथून आलेली पेज नदी येथील मवनेच्या पूलावर ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. हुमगाव येथील रहिवाशी किशोर बागडे यांचा ट्रॅक्टर असून या ट्रॅक्टरवर चालक संकेत बार्शी हा होता. संकेत ट्रॅक्टर चालवत असताना अचानक स्टेअरिंग फिरलं असता त्याला ते पुन्हा फिरवता आलं नाही, त्यामुळे ट्रॅक्टर नदीच्या पूलावरून पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात संकेत याचा ट्रॅक्टरखाली येऊन जागीच त्याचा मृत्यू झाला आहे. तो या ट्रॅक्टरने ग्रिट वाहून नेत होता. संकेतच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये एकच हळवळ व्यक्त केली जात आहे.
Solapur News : एकाचवेळी शिक्षकांची बदलीची ऑर्डर येऊन धडकली, विद्यार्थ्यांसह अख्खं गाव ढसाढसा रडलं; गेटसमोर नतमस्तक होऊन शेवटचा निरोप
नौदल अधिकारी सुरजसिंह यांचा मृतदेह अखेर सापडला
दरम्यान, मुंबई शहरातील कुलाब्यातील डॉकयार्ड येथे सेवेत असलेले नौदल अधिकारी सुरजसिंह अमरपालसिंह चौहान (वय 33, रा. राजस्थान) दिनांक 7 सप्टेंबर 2025 पासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते. 29 मे 2025 रोजी त्यांची नेमणूक मुंबईच्या नौदलाच्या FTTT विभागात झाली होती. नेव्ही नगर येथे ते राहत होते. सुरजसिंह अमरपालसिंह चौहान यांचा मोबाईलही बंद लागत होता. त्यामुळे नौदल, पोलीस व नातेवाईक यांच्यात चिंता पसरली होती.
Beed News : बीडच्या मस्साजोगमध्ये हृदयद्रावक घटना, कंत्राटी कर्मचाऱ्याचा करुण अंत; अमोलसोबत नेमकं काय घडलं?
मोबाईल लोकेशन कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड स्टेशन परिसरात मिळाल्यानं नेरळ पोलीस, नौदलाचे अधिकारी व नातेवाईक यांनी संयुक्तरीत्या शोधमोहीम राबवली. नेरळ-माथेरान परिसरातील जंगलात शोधकार्य सुरू असताना अखेर या नौदल अधिकारी यांचा मृतदेह माथेरान डोंगरातील पाली भूतिवली धरण ते गार्बेट या मार्गावरील सातोबा मंदिरामागील टेकडीवरील 50 फूट खोल दरीत मृतदेह दिसून आला. नौदल अधिकारी यांचा मृतदेह स्थानिक आदिवासी गुराखी यांना दिसून आल्यानंतर त्यांनी नेरळ पोलिसांना कळवलं.

