मुंबईतील ऍपल स्टोअरबाहेर आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. दिल्लीच्या अंकुश गोयलने रात्रभर रांगेत उभे राहून पहिला आयफोन खरेदी केला. मार्केटिंगमध्ये काम करणारा अंकुश यापूर्वीही आयफोनच्या नवीन सीरिजसाठी उत्सुक होता.
२०१५ मध्ये आयफोन १७ सीरिज आल्यावर शुक्रवारी बीकेसीतील ऍपलच्या दालनाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी २६ वर्षीय अंकुश गोयलचं नाव चर्चेत आलं. अंकुश दालनाच्या बाहेर रात्रभर उभा होता. जेवण, पॉवर बँक सोबत घेऊन तो सकाळ होण्याची वाट पाहात होता. अखेर दुकान उघडलं आणि अंकुशला पहिला iPhone 17 Pro Max खरेदी करण्याची संधी मिळाली.
अंकुश गोयल दिल्लीचा रहिवासी असून तो मार्केटिंग प्रोफेशनल आहे. आयफोन खरेदीचा उत्साह प्रचंड असल्यानं रात्रभर रांगेत उभा होतो, असं अंकुशनं सांगितलं. ‘लेटेस्ट आयफोन सर्वप्रथम माझ्या हाती पडला. हा अनुभव अवर्णनीय आणि अविस्मरणीय आहे,’ अशा भावना अंकुशनं व्यक्त केल्या. अंकुश गुरुवारी रात्रीपासूनच ऍपल दालनाच्या बाहेर उभा होता. जेवण आणि पॉवर बँक तो सोबतच घेऊन आला होता. iPhone 17 Pro Max चं 256 जीबी मॉडेल घेऊन अंकुश दालनाच्या बाहेर पडला. लेटेस्ट आयफोन खरेदी करणारा तो पहिला ग्राहक ठरला.
अमेरिकेत आयफोनसाठी लोक वेडे आहेत. त्यामुळेच मला आयफोनबद्दल आकर्षण वाटू लागलं. अंकुशनं आयफोन १६ आणि आयफोन १५ सीरिजचे फोनही सर्वात आधी खरेदी केले होते. त्यामुळे आता अंकुशच्या नावे आता एक विक्रम नोंदला गेला आहे. सोशल मीडियावर अंकुशची बरीच चर्चा झाली. काही जण त्याची खिल्ली उडवत आहेत. ऍपलच्या दालनाबाहेर रात्र काढणार्या अंकुशला पद्मश्री द्या, असं म्हणत काहींनी त्याला टोले लगावले आहेत. पण एखाद्या फॅनसाठी क्रेझ काय असते, हे अंकुशनं दाखवून दिलं आहे.

