Nagpur Man Suspicious death in Bathroom : शवविच्छेदनात गुन्हेगारी कृत्य उघडकीस आल्याने एका अल्पवयीन मुलासह एकूण पाच कुटुंबीयांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
शवविच्छेदनात गुन्हेगारी कृत्य उघडकीस आल्याने एका अल्पवयीन मुलासह चार कुटुंबीयांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. बेरोजगार आणि दारूचे व्यसन असलेले सुधीर खंडारे हे बाथरुममध्ये पडल्याने डोक्याला नळाचा मार लागल्याने मृतावस्थेत आढळले होते, असे कुटुंबीयांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
मानकापूर पोलिसांनी सुरुवातीला या दाव्यांच्या आधारे हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून नोंदवले. मात्र, शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर जखमा आणि फासळ्या तुटलेल्या आढळल्या. संशय निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी तपास केला असता कुटुंबीयांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Mumbai Crime : दादरला लोकलमधून उतरणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन, 62 वर्षीय वृद्धाला अटक
आरोपींमध्ये मोठे भाऊ योगेश, वय 55, भाऊ राजेश, वय 43, आई कौशल्या, वय 70, वहिनी रूपा, वय 52 आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. वरिष्ठ निरीक्षक हरीश काळसेकर पुढील तपास करीत आहे.
Crime News : मॅडम, शाळेचं काम आहे; 31 वर्षीय शिक्षिकेशी ओळख वाढवली, एकटी असताना घरात घुसून अत्याचार
अकोल्यात शासकीय रुग्णालयात दगडाने ठेचून हत्या
दुसरीकडे, अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय परिसरात एका भिक्षेकऱ्याची दगडाचे ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली. शांताराम गोपनारायण रा. घुसर येथील रहिवासी आहे. या प्रकरणात वर्धा येथील मूळ रहिवासी असलेल्या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
शांताराम आणि आरोपी हे दोघेही भिक मागून आपला उदरनिर्वाह करीत होते. पावसाचे दिवस असल्याने रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात झोपत असत. काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाखाली त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्याच वादातून मंगळवारी पहाटे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद वाढल्याने आरोपीने शांतारामची हत्या केल्याचा आरोप आहे.

