Pravin Darekar : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर वसईतील एका कार्यक्रमासाठी आले असताना लिफ्टमध्ये अडकले. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याने ती तळमजल्यावर गेली आणि बंद पडली. कार्यकर्त्यांनी तातडीने लिफ्ट तोडून त्यांची सुटका केली. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतु सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. प्रवीण दरेकर आता सुखरूप आहेत.
प्रवीण दरेकर वसईतील एका सभागृहाच्या लिफ्टमध्ये अडकले होते. कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडून प्रवीण दरेकर यांना बाहेर काढलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण दरेकर 5 ते 7 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडून प्रवीण दरेकर यांना विचावलं आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकास मार्गदर्शन शिबिरासाठी आज वसई त आले होते. वसई पश्चिमेतील एका सभागृहात हा कार्यक्रम होता. प्रवीण दरेकर हॉलच्या इमारतीत आले तेव्हा ते लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर जात होते. त्या लिफ्टची क्षमता ही 10 जणांची होती. पण संबंधित लिफ्टमध्ये तब्बल 15 जण होती. त्यामुळे ती लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर जाण्याऐवजी तळमजल्यावर आली. लिफ्ट तळमजल्यावर आल्यानंतर अडकून पडली होती.
लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर न जाता तळमजल्यावर आली आणि बंद पडून राहिली. यामुळे अचानक खळबळ उडाली. सगळेजण अस्वस्थ झाले. यावेळी कार्यकर्ते आणि प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षा रक्षकांनी लिफ्ट तोडून त्यांना बाहेर काढलं. प्रवीण दरेकर यांना बाहेर काढल्यानंतर ते प्रचंड घामाघूम झालेले बघायला मिळाले. त्यांनी बाहेर येताच पाणी पिलं. यानंतर ते तीन मजली चालत कार्यक्रमस्थळी गेले. सगळ्यांनी प्रसंगावधान साधल्यामुळे आज मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी या घटनेवर अद्याप तरी प्रतिक्रिया दिलेली नाही.

