Mumbai मुंबईच्या बांद्रा बँडस्टँडवर एक धाडसी पोलीस कॉन्स्टेबलने अद्वितीय पराक्रम दाखवला आहे. एका महिलेने मानसिक तणावामुळे समुद्रात उडी घेतली. साईनाथ देवडे, या पोलीस कर्मचाऱ्याने त्वरित निर्णय घेत समुद्रात उडी मारली आणि महिलेचा जीव वाचवला.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 53 वर्षीय वेनेशिया सरिता क्रास्टा ही महिला बांद्रा वेस्ट येथे राहणारी आहे. ती गेल्या 20 वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला भास होत होता की, कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे, त्यामुळे तिने समुद्रात उडी मारली.
ड्यूटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ देवडे यांनी महिलेला समुद्रात उडी मारताना पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी समुद्रात उडी मारून तिला वाचवले. महिलेची प्रकृती चिंताजनक होती, तिला तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आता तिची प्रकृती स्थिर आहे.
Alibag News: मुंबईहून पार्टीसाठी अलिबागला आले, रात्री नशेत सहकऱ्याकडून महिलेवर जबरदस्ती, अन् मग सकाळी…
बांद्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे यांनी सांगितले की, महिला आता धोक्याबाहेर आहे. ते म्हणाले, महिला गेल्या 20 वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत.महिलेच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. पोलीस सध्या महिलेला योग्य मानसिक आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई पोलिसांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर या घटनेची माहिती दिली आहे.
A 53-year-old woman with a mental illness jumped into the sea at Bandstand, Bandra, reportedly fearing that someone was chasing her.
Upon witnessing the incident, on-duty Police Constable Sainath Devde immediately dived into the water and rescued her.
She was semi-conscious… pic.twitter.com/20WgVZh9fl
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) July 3, 2025
या घटनेनंतर कॉन्स्टेबल साईनाथ देवडे यांच्या बहादुरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

