Sangli Crime News: सांगलीत एका मित्रानेच दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सांगलीत एकच खळबळ उडाली आहे.
सांगली पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत शिकलगार आणि संशयित पट्टेकरी हे दोघे एकाच गल्लीत राहण्यास आहेत. शिकलगार हे सेंट्रींगचे काम करत होते. तर पट्टेकरी हा त्यांच्याकडे मजूरीचे काम करत होता.
वादातून जबर मारहाण
एका मुकादमाने बुधगाव येथील आरसीसी चेंबरचे काम शिकलगार यास दिले होते. त्यामुळे शिकलगार याने पट्टेकरी याला सोबत घेवून काम करण्यास सुरूवात केली. दरम्यानच्या काळात पट्टेकरी याने दुसऱ्याकडे कामला गेला. यातून दोघांत बुधवारी (2 जुलै) रात्री वादावादी झाली. या वादात शिकलगार याने पट्टेकरी याला जबर मारहाण केली. त्या मारहाणीचा राग पट्टेकरी याच्या डोक्यात गेला होता.
Mumbai News: कोणीतरी पाठलाग करतंय; मुंबईत महिलेची समुद्रात उडी, पोलीस कॉन्स्टेबलने जीवाची पर्वा न करता वाचवलं
उपचारादरम्यान मृत्यू
गुरुवारी (3 जुलै) सकाळी साडे आठच्या सुमारास पट्टेकरी हा धारधार चाकू घेवून धुंद अवस्थेत झेंडा चौकात पोहोचला. त्याठिकाणी उभ्या असणाऱ्या शिकलगार याच्याशी वादावादी झाली. याच वादातून पट्टेकरी याने चाकूने शिकलगार यास भोसकले. यामध्ये त्याच्या छातीवर वर्मी वार झाल्याने शिकलगार हा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला. त्याठिकाणी पट्टेकरी चाकू घेऊन तसाच उभा होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ शिकलगार याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

