CJI Bhushan Gavai Expressed Displeasure : सरन्यायाधीश भूषण गवई यांचा मुंबईत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरुन सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. याबाबतच्या कानउघाडणीनंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती सरन्यायाधीशांच्या स्वागतासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्काराचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात भूषण गवई यांना नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भूषण गवई यांच्या सत्काराच्या कार्यक्रमावेळी अनेक मान्यवरांनी भाषण केलं. यानंतर सर्वात शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले सरन्यायाधीश भूषण गवई याांनी भाषण केलं. यावेळी भूषण गवई यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरु नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
भूषण गवई नेमकं काय म्हणाले?
भूषण गवई यांनी आपल्या भाषणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अनुपस्थितीवर खंत व्यक्त केली. सरन्यायाधीश म्हणून मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार राज्याचे पोलीस महासंचालक, राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्त उपस्थित राहणं अपेक्षित होतं. पण या अधिकाऱ्यांना इकडे का यावं वाटलं नाही? याचा त्यांनी स्वत: विचार करावा, अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली.
Narkatkla Swarg : पडद्यामागचे राजकीय किस्से, ‘मोदी मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांना भेटायला आले अन्…’
आपली नाराजी व्यक्त करत असताना सरन्यायाधीशांनी आपल्या पंजाब येथील कार्यक्रमाचा दाखला दिला. पंजाबला आयोजित कार्यक्रमाला गेलो असता त्या कार्यक्रमाला प्रोटोकॉलनुसार तिथल्या राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि मुख्य सचिव कार्यक्रमाला उपस्थित होते, असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितलं.
Narkatla Swarg : ‘वाजपेयींना त्यावेळी नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हटवायचे होते, पण बाळासाहेबांनी…’, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
भूषण गवई यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केल्यानंतर लगेच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी चैत्यभूमीच्या दिशेला धाव घेतली. कारण तोपर्यंत कार्यक्रम आटोपला होता. सरन्यायाधीश भूषण गवई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यावेळी महाराष्ट्राचे तीनही वरिष्ठ अधिकारी चैत्यभूमीवर दाखल झाले.

