Sejal Pawar Against Case Registered : मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालायमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या सेजल पवार हिला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. प्रणित मोरेच्या स्टॅण्डअप कॉमेडी कार्यक्रमामध्ये तिने केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे तिच्यावर रुग्णालय प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
सेजल पवार सक्तीच्या रजेवर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : केईएम रुग्णालायमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या सेजल पवार हिला पंधरा दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. प्रणीत मोरेच्या स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमामध्ये तिने केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे तिच्यावर रुग्णालय प्रशासनाने ही कारवाई केली आहे. शनिवारी तिच्या पालकांसह तिला समुपदेशनासाठी बोलवण्यात आले होते. तिने केलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांच्या चौकशी समितीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
मृतदेहासंदर्भात केलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल
पुढील चौकशीदरम्यान समितीसमोर प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन उपस्थित राहण्याचे निर्देश तिल्या देण्यात आले आहेत. प्रणीत मोरे याच्या कार्यक्रमामध्ये सेजल हिने अवयवदान आणि मृतदेहासंदर्भात केलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध घटकांतून या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अवयवदानाच्या मोहिमेसाठी तळमळीने काम करणाऱ्यांकडूनही या संदर्भात तीव्र नाराजी वर्तवण्यात आली आहे. रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयालाही या संदर्भात ई-मेलद्वारे लेखी तक्रारी प्राप्त झाल्या असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ वरिष्ठ प्राध्यापकांची प्राथमिक तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आली. या समितीने या कार्यक्रमामध्ये व्हायरल झालेली संपूर्ण चित्रफीत पाहिली असून, या विद्यार्थ्यींनीला समुपदेशनासाठीही बोलावले होते; तसेच तिला रुग्णालयाच्या आवारामध्ये प्रवेश घेण्यास तूर्तास मनाई करण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी उलथापालथ, एकाच जिल्ह्यातल्या 33 हजार महिला कायमच्या अपात्र; राज्यभरातील लाभार्थ्यांची धाकधूक वाढली रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांनी या विद्यार्थिनीची सुरक्षा आणि मानसिक आरोग्याच्या संदर्भात रुगणालय प्रशासनाला चिंता असल्याचे सांगितले. तिला पंधरा दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, तिच्या पालकांना समुपदेशनाची व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ती वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने तिच्यावरील सर्व कारवाईही नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात येणार आहे. Mira-Bhayander Flyover: भाईंदरचा ‘तो’ बॉटल नेक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंदच, वादग्रस्त पुलाच्या उद्घाटनासाठी नेते मंडळी अनिच्छुक
सेजल पवारविरोधात गुन्हा
मेंदू मृतावस्थेमध्ये असलेल्या दात्यांबद्दल मोरे याच्या स्टॅण्डअप कॉमेडी शोमध्ये सेजल पवारने आक्षेपार्ह विधान केले होते. वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असणारी संवेदनशीलता, विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असणारी प्रतिष्ठा, व्यावसायिक मूल्यांना धरून हे वर्तन नसल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणी प्रणित मोरे , सेजल पवार आणि हिंमाशू जाग्रा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा