Shivsena Uddhav Thackeray Party News- विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. शिंदे गटाने ऑपरेशन टायगर अंर्तगत विदर्भातही मोठा डाव टाकत. बड्या नेत्याला पक्षात घेतले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विस्तार सुरू आहे. पूर्व विदर्भाचे नेते किरण पांडव यांच्या पुढाकाराने अलीकडेच शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात जुन्या शिवसैनिकांनी पक्षात प्रवेश केला. गेल्या आठवड्यात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम झाला. दरम्यान, भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे पूर्व विदर्भाच्या समन्वयकपदाची जबाबदारी आली आहे. संघटनेत त्यांचे वजन वाढताच त्यांनी विस्तारावर भर दिला आहे. मंगेश काशीकर यांच्याकडे चंद्रपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
बंडू तागडे कोण?
माजी खासदार प्रकाश जाधव यांचे विश्वासू बंडू तागडे कामगार चळवळीशी देखील जुळलेले आहेत. शिवसेना नेते विनायक राऊत यांचे देखील निकटवर्यीय म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, राजू हरणे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केले.
महापालिका निवडणुक आणि ऑपरेशन टायगर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असल्याने पक्षाच्या विस्तारात जुन्या शिवसैनिकांना प्राधान्य दिले जात आहेच. तसेच मुंबई, ठाणे, पुण, नागपूरसह सर्वच महापालिकेवर शिवसेना शिंदे गटाने लक्ष केंद्रित केले असून राज्यभर ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. पक्षात प्रवेश करणाऱ्यांना योग्य जबाबदारी दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. मात्र, अद्याप अशा कुठल्याच नियुक्त्या झालेल्या नाही. तातडीने पदाधिकारी नियुक्त करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

