Maharashtra Weather Forecast : राज्यात हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठ जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्येही पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यावर अवकाळीचे संकट कायम हवामान खात्याचा मोठा इशारा
अजूनही राज्यावर अवकाळीचे ढग कायम आहेत. राज्यात सध्या पावसाला पोषक असे वातावरण बघायला मिळतंय. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णता वाढताना दिसतंय. काही ठिकाणी पारा ४४ अंश सेल्सिअस असल्याचेही बघायला मिळाले. आता भारतीय हवामान खात्याकडून मोठा इशारा दिलाय. पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आलाय. म्हणजे काय तर अजूनही अवकाळी पावसाचा पिच्छा सुटलेला नाहीये.
Pune Crime : एक नकार अन् त्याने बबिताला संपवलं! पुण्यात रात्रभर बायकोची बॉडी घेऊन फिरला; हत्येचं कारण समोरतब्बल आठ जिल्ह्यांमध्ये आहे होऊ शकते गारपिट
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हेच नाही तर आठ जिल्हांमध्ये गारपिटीचा इशारा आहे. विदर्भातील काही शहरांमध्ये पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा इशारा अगोदरच हवामान खात्याने दिलाय. यादरम्यान जोरदार वारेही वाहण्याची शक्यता आहे. गडचिरोली, गोदिंया, अकोला, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम आणि भंडाऱ्याचा समावेश आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी याठिकाणी पुढील तीन दिवसांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाजा आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबतच पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. गारपिटीचा देखील इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. पुढील काही दिवस राज्यावर अवकाळीचे संकट असणार असल्याचे स्पष्ट झालंय.

