• Mon. Mar 9th, 2026

    पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत, राज्य मंंत्रिमंडळ बैठकीत फडणवीसांचा मोठा निर्णय

    पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत, राज्य मंंत्रिमंडळ बैठकीत फडणवीसांचा मोठा निर्णय

    CM Devendra Fadnavis Govt: राज्य सरकारने मोठी घोषणा करत पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाने पीडित कुटुंबांना आधार मिळणार आहे. या घोषणेमुळे सरकारचं कौतुक केलं जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय, सरकार पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे लक्ष देणार असल्याचंही राज्य सरकारने सांगितलं आहे. त्याशिवाय, आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी दिली जाणार असल्याचाही निर्णय घेतला गेला आहे.

    राज्य सरकारने मोठी घोषणा करत पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाने पीडित कुटुंबांना आधार मिळणार आहे. या घोषणेमुळे सरकारचं कौतुक केलं जात आहे.

    महाराष्ट्रातील मृतांची नावे
    1) अतुल मोने – डोंबिवली
    2) संजय लेले – डोंबिवली
    3) हेमंत जोशी- डोंबिवली
    4) संतोष जगदाळे- पुणे
    5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
    6) दिलीप देसले- पनवेल

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed