• Wed. Jul 22nd, 2026

    दिव्यांग सशक्तीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 22, 2026
    दिव्यांग सशक्तीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. २२: भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या वतीने दिले जाणारे ‘दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’ साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे पुरस्कार दरवर्षी ३ डिसेंबर रोजी “आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना निमित्त दिव्यांग व्यक्तीच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत असणा-या उकृष्ट दिव्यांग व्यक्ती, इतर व्यक्ती आणि संस्थाना प्रदान केले जातात. मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था, नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करावेत, असे दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे सहायक आयुक्त रविकिरण पाटील यांनी सांगितले.

    या पुरस्कारासाठी अर्ज करताना संबंधित दिव्यांग व्यक्तीने किंवा संस्थेने केलेल्या उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी कार्याची सविस्तर माहिती पुराव्यांसह नमूद करणे आवश्यक आहे. त्यासोबत युडीआयडी कार्ड किंवा अधिकृत दिव्यांग प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच या राष्ट्रीय पुरस्कारासाठीचे सर्व अर्ज व नामांकने केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in ऑनलाईन माध्यमातून केलेले अर्जच विचारात घेतले जाणार असून हस्तलिखित, टपाल अथवा इतर कोणत्याही भौतिक स्वरूपात प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र घटकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपले अर्ज वेळेत सादर करावेत, असेही जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

    0000

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed