• Sun. Mar 8th, 2026

    जीव देण्यापूर्वी डॉ. वळसंगकरांचे चौघांना फोन, CDRमध्ये धक्कादायक माहिती

    ByMH LIVE NEWS

    Apr 28, 2025 #breaking news Solapur, #Crime, #crime batmya, #crime news marathi, #daughter-in-law questioned, #DNB neurosurgeon questioned, #doctor family conflict, #doctor mental health, #doctor suicide mystery, #Dr. Shirish Valsangkar suicide, #Dr. Sonali Valsangkar, #family claims harassment, #harassment in medical field, #high-profile suicide, #Latest Marathi News, #Maharashtra doctor suicide, #Maharashtra News, #Manisha Mane arrest, #medical community reaction, #mental harassment case, #mental torture case, #neurosurgeon suicide case, #police interrogation updates, #police investigation Solapur, #police statement Solapur, #psychological abuse case, #Shirish Valsangkar wife, #solapur, #solapur city, #solapur crime news, #Solapur doctor suicide, #Solapur neurosurgeon news, #Solapur News Update, #suicide due to torture, #suicide note investigation, #suspicious suicide case, #tragic doctor suicide, #आत्महत्या चिठ्ठी तपास, #कुटुंबाचा छळाचा आरोप, #छळामुळे आत्महत्या, #डीएनबी न्यूरोसर्जन चौकशी, #डॉ. वळसंगकर पत्नी, #डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण, #डॉ. शोनाली वळसंगकर, #डॉक्टर आत्महत्या मिस्ट्री, #डॉक्टर कुटुंबातील वाद, #डॉक्टर मानसिक आरोग्य, #दु:खद डॉक्टर आत्महत्या, #न्यूरोसर्जन आत्महत्या प्रकरण, #पोलिस चौकशी अपडेट, #पोलिस चौकशी सोलापूर, #पोलिस तपास सोलापूर, #प्रसिद्ध डॉक्टर आत्महत्या, #मनीषा माने अटक, #मराठी बातम्या, #महाराष्ट्र टाइम्स marathi news, #महाराष्ट्र डॉक्टर आत्महत्या, #महाराष्ट्र बातम्या, #मानसिक छळ प्रकरण, #मानसिक त्रास प्रकरण, #वैद्यकीय क्षेत्र प्रतिक्रिया, #वैद्यकीय क्षेत्रात छळ, #शिरीष वळसंगकर कोण, #संशयास्पद आत्महत्या, #सून डॉ. शोनाली, #सोलापूर गुन्हा बातमी, #सोलापूर डॉक्टर आत्महत्या, #सोलापूर न्यूरोफिजिशियन बातमी, #सोलापूर ब्रेकिंग न्यूज
    जीव देण्यापूर्वी डॉ. वळसंगकरांचे चौघांना फोन, CDRमध्ये धक्कादायक माहिती

    Dr. Shirish Valsangkar Death Case: न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या फोनच्या सीडीआरवरुन बरीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर करण्यापूर्वी चौघांना फोन केल्याची माहिती आहे.

    (फोटो– Lipi)

    इरफान शख, सोलापूर: प्रख्यात न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सदर बाजार पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांच्या मोबाईलवरील सीडीआर प्राप्त केला असून ज्यादिवशी त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली, त्या दिवसभरात डॉक्टरांच्या मोबाईलवर 27 कॉल आले होते, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तसेच, आपली आयुष्य संपवण्यापूर्वी त्यांनी रात्री आठ वाजेनंतर चौघांना फोन केल्याची माहिती आहे. ते चौघे कोण, याचा तपास सध्या सुरु आहे.

    डॉ. वळसंगकर यांच्या मृत्यू प्रकरणात एसपी न्यूरोसायन्स रुग्णालयातील महिला कर्मचारी मनीषा मुसळे मानेला अटक झाली असून सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. मनीषा मानेचे वकील ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे जामीनासाठी अर्ज करणार आहेत. एका ई-मेल वरून डॉक्टर आपला जीव कसे देऊ शकतात, असा दावा ऍड प्रशांत नवगिरे करत आहेत. मनीषाने ईमेल मधून व्यथा मांडली होती, वस्तुस्थिती वेगळी आहे, सीडीआरमधून महत्वाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे, आयुष्य संपवण्यापूर्वी डॉक्टरांच्या मोबाईलवर कुणाचे कॉल आले होते, असे अनेक मुद्दे ऍड प्रशांत नवगिरे कोर्टात मांडणार आहेत.

    ऍड प्रशांत नवगिरे यांचे म्हणण्यानुसार, डॉ. वळसंगकरांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी मनीषा पोलीस कोठडीनंतर सध्या ९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. मनीषाला यापूर्वी पाच दिवस पोलीस कोठडी सुनावलेली आहे, त्यामुळे तिचा प्राथमिक तपास संपलेला आहे, असे दिसून येते. तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. दोन मुलांची जबाबदारी तिच्यावर आहे, असं ऍड प्रशांत नवगिरे यांचे म्हणणे आहे.
    Shirish Valsangkar: मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट
    डॉक्टरांच्या मृत्यू प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे. मनीषा माने या महिला कर्मचाऱ्यास खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. सदर हॉस्पिटलमध्ये सन २००८ पासून सेवा बजावत आली आहे. गुन्हा दाखल होईपर्यंत फिर्यादी अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून कोणतेही आरोप केलेले नव्हते. आरोपाप्रमाणे मनीषा त्रासदायक होती तर तिला जबाबदारी दिली नसती. तिला त्याच वेळी नोकरीवरून कमी केले असते अथवा तिच्याविरुद्ध तक्रारी झाल्या असत्या, असे आरोपींच्या वकिलांचे म्हणणे आहे

    सुसाईड नोट हस्ताक्षर तज्ज्ञांकडे

    डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट त्यांच्याच हस्ताक्षरातील आहे का? याच्या पडताळणीसाठी पोलिसांनी गुरुवारी २४ एप्रिल रोजी रुग्णालयातून डॉक्टरांचे हस्ताक्षर व स्वाक्षरी असलेली काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यावरील हस्ताक्षर एकच आहे का? या पडताळणीसाठी कागदपत्रे हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली आहेत. त्याचा रिपोर्ट पुढील आठवड्यात मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed