नांदेड -प्रतिनिधी
किनवट येथील शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेने बेकायदेशीररित्या सभासदांची नावे कमी केल्या प्रकरणी व सरकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 35 नुसार घेतलेल्या ठरावाची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालया कडून अमल बजावणी केली नसल्याने संस्थेच्या कारभाराची सखोल चौकशी करून संस्थेला अवसायांनात टाकावे या मागणीसाठी माजी नगरअध्यक्ष इसा खान सरदार खान, तिरुपती नेमानीवार, युसुफ खान हे लातूर येथील विभागीय सह निबंधक सहकारी संस्था कार्यालया समोर कामगारदिनी म्हणजे 1 मे रोजी लातूर येथे आमरण उपोषणला बसणार आहेत. शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्थाची नोंदणी रन.एन. एन. डी./बी.एच.आर /एच. एस.जी. २७४-८१ दिनांक १९/३/१९८१ रोजी २९ सभासदानी मिळून संस्था निर्माण केली व पैसे जमा करून शेत सर्वे न.267/2 ही जमीन/भूखंड घेउन त्याच्या ले आऊट टाकून प्लॉट वाटप करण्यात आले होते असे असताना सुद्धा गेल्या चाळीस वर्षा पासून आज पर्यंत संस्थेचे प्लॉट भागपत्रक, वाटप प्रक्रिया करण्यात आले नाही.
तसेच संस्थेचे मूळ सभासद २९ होते २९ सभासदानी मिळून संस्थाच्या नावे शेत 267/2 जमीन घेतली व त्या भूखंडाचे पूर्ण पैसे देऊन खरेदी खत करून संस्थेचे नावे ७/१२ करून घेतला भूखंड घेतल्या नंतर त्यामध्ये ले आऊट मंजूर करून घर बांधण्यासाठी नगर परिषद कडे रीतसर परवाना परवाना घेतला होता परंतु काहीं अवधी नंतर चेअरमन यांनी बेकायदेशिर परस्पर २२ सभासदाना संस्थेत सामावून घेतले तसेच त्या २२ सभासदानी कोणत्याच बँकेत पैसे भरलेले नाहीत.संस्थेने १९८१ अगोदरच जमीन खरेदी करून त्या भूखंडावर ले आउट टाकून प्लॉट पाडण्यात आले आहेत असे असताना पुन्हा २२ सभासद संस्थेमध्ये वाढवन्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. १९८१ ते ८३दरम्यान लेखा परीक्षण करण्यात आले मात्र त्यात २२ सदस्याची कोणतीच नोंद घेण्यात आली नाही.22 सभासद घेतलेला ठराव नियमबाह्य असून युसुफ खान हे त्या ठरवाचे सूचक नाहीत. या बाबत युसूफ खान यांनी किनवट येथील सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या कडे अनेक तक्रारी दिलेल्या आहेत परंतु त्यांच्या तक्रारीची अदयाप पर्यंत दखल घेतली गेली नाही.
संस्थेचे तत्कालीन चेअरमन हणमंतलू दडगेलवार यांचा २६ ऑगस्ट २०२१ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा रामकृष्ण दडगेलवार यांची चेअरमन पदी निवड झाली यासाठी मतदान घेतले नाही किंवा हरकती घेण्यात आल्या नाही.संस्थेत त्यांच्या परिवारातील दहा नावे सामाविष्ट केल्याचा आरोप इसाखान यांनी केला असून या प्रकरणी शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेच्या गैरकारभाराची सखोल चौकशी करून संस्थेला अवसायानात टाकावी या मागणीसाठी 1 मे 2025 या महाराष्ट्रदिनी लातूर येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा ईशारा माजी नगराध्यक्ष ईसाखान सरदार खान यांनी दिला आहे.
