• Wed. Sep 9th, 2026

गर्भवती मुलीला बापानंच संपवलं, जावई गंभीर…जळगावमध्ये सैराटची पुनरावृत्ती काय घडलं?

गर्भवती मुलीला बापानंच संपवलं, जावई गंभीर…जळगावमध्ये सैराटची पुनरावृत्ती काय घडलं?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2025, 8:59 pm

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात शनिवारी रात्री सैराट चित्रपटासारखी घटना घडलीये. एका सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने आपल्या गर्भवती मुलीला संपवलंय. मुलीनं प्रेम विवाहाच्या रागातून त्यानं आपल्या मुलीसह जावयावर गोळ्या झाडल्या. जावयाच्या बहिणीच्या लग्नानिमित्त आयोजित हळदीच्या कार्यक्रमात निवृत्त पोलीस अधिकारी किरण मांगले याने आपली मुलगी तृप्ती वाघ आणि जावई अविनाश वाघ या दोघांवर गोळ्या झाडल्या. या घटनेत मुलगी तृप्ती वाघ हिचा जागेत मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे. तर या घटनेनंतर जमावाने गोळीबार करणाऱ्या निवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे मृत्युमुखी पडलेली तृप्ती ही चार महिन्यांची गर्भवती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed