• Fri. Jun 5th, 2026
    पहलगाम हल्ल्यानंतर नवनीत राणा संतापल्या, ‘माझा मुलगा म्हणतो, गोळ्या खाणार पण मुस्लीम होणार नाही’

    Navneet Rana on Pahalgam Terror Attack : पहलगाममधील प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यांनुसार, दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. यातच नवनीत राणा आपल्या लहान मुलाचं उदाहरण देत म्हणाल्या ‘गोळ्या खाणार पण कुराण वाचणार नाही.’

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    अमरावती : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यांनुसार, दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. यामुळे देशवासीयांनी संताप व्यक्त केला आहे. तर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदुंना टार्गेट करत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे धार्मिक वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. यातच आता भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी पहलगाम हल्ल्याबाबत मोठे विधान केले आहे. आपल्या लहान मुलाचे उदाहरण देत त्या म्हणाल्या ‘गोळ्या खाणार पण कुराण वाचणार नाही.’ यामधून त्यांनी पुन्हा हिंदुत्वाचा हुंकार भरल्याचे दिसते.

    अमरावतीमधील एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना नवनीत राणा म्हणाल्या, ‘आमच्या बहि‍णींना धर्म विचारण्यात आला, त्यांना कलमा वाचायला सांगण्यात आलं. पण त्यांना कलमा वाचता आलं नाही. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतीच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या घेतल्या पण ते कलमा वाचायला तयार झाले नाहीत.’
    पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा, दहशतवादी कसे आले आणि कुठे गेले?
    नवनीत राणांनी पुढे माझा मुलगा लहान आहे, २ वर्षांचा आहे. मी त्याला विचारलं की कलमा (कुराण) वाचणार का? तर त्याने म्हटले, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाणार पण मुसलमान होणार नाही, असे उदाहरण हिंदुत्वाचा नारा पुन्हा गिरवल्याचे दिसते.

    नवनीत राणांनी धमकीवजा इशारा देत म्हटले की, पाकिस्तानकडे एवढी ताकद नाही की ते भारताकडे डोळे वरती करुन पाहतील. आमच्या देशात एक वाघ बसलाय ज्याचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. आणि अमित शाह पण इथे बसले आहेत. आता तर फक्त पाणीच बंद केलं आहे, पण उद्या दाणाही बंद केला जाईल. भुट्टो सारख्याला भुट्ट्यासारखं भाजतील, मला मोदीजी, अमित शहा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असा राणांनी आक्रमकपणे म्हटले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed