Solapur Neurologist Doctor Ends Life by Shooting Himself : सोलापुरात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
अनेकांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरने स्वत:चं आयुष्य संपवलं –
शहराच्या रामवाडी परिसरात असलेल्या वळसंगकर रुग्णालयाने अनेक मेंदूरोग रुग्णांना जीवनदान दिलं आहे. त्याच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घरगुती कारणांमुळे डॉ शिरीष वळसंगकर यांनी अनेक दिवसांपासून प्रॅक्टिस कमी केली होती. त्यांची प्रॅक्टिस कमी झाली असतानाच त्यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Devgad News : महिला दोन चिमुकल्यांसह घरातून निघाली ते परत आलीच नाही, नंतर खाडी किनारी… सिंधुदुर्गात खळबळ
सोलापूरमध्ये मेंदू रोग रुग्णांसाठी मोठं रुग्णालय सुरू करणारे डॉ शिरीष वळसंगकर –
डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील पहिले न्यूरॉलॉजिस्ट होते. डॉ. वळसंगकर यांनी मेंदूवर विविध आणि अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय सुरू केलं होतं. सोलापूरमध्ये न्यूरॉलॉजी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉ. शिरीष वळसंगकर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
Solapur News : न्यूरॉलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी संपवलं आयुष्य, राहत्या घरात स्वत:वर गोळ्या झाडल्या; सोलापुरात खळबळ
आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट –
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अनेक महिन्यांपासून वयोमानानुसार प्रॅक्टिस बंद केली होती. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी बंदुकीतून दोन गोळ्या स्वत:च्या डोक्यात झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब डॉ. शिरीष वळसंगकर यांना जखमी अवस्थेत स्वतःच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचार सुरू असताना डॉ. शिरीष वळसंगकर यांची प्राणज्योत मालवली. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्याने सोलापूरसह संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

